नील निळ्या आकाशात उडती
रंगीबेरंगी पतंग किती…
पृथ्वीवरून उडत जाऊन,
आकाशास गवसणी घालू बघती…
अलगद दोरीवर लटकूनी
गगनात हर्षे विहरती…
वार्यासवे फडफड करून
ऊंच अंबरी विराजती
मनी जाणती एक गुपितच की
उडत असलो ऊंच जरी
नाजुक दोरही आयुष्याची आमच्या
असे मानवाच्याच करी……
हळूच जराशी ढील देऊनी
आम्हां सदैव उंचावर धाडी
चटकन गोता खावून आम्ही
पुन्हा घेतो गगन भरारी……
पण…याच्या मनीची आक्रमकता
काटाकाटीचा खेळ करी
क्षणात एका काटतो हवेतची
स्ववर्चस्वाची देत ग्वाही……
इतस्ततः मग भरकटून जातो
होते आमुची कटी पतंग ही
अरे मानवा आमची अवहेलना
तुझ्या मनीच्या द्वेषाचे संग
तू जेव्हा ईर्षा त्यागशिल
कोणी न होईल मग “कटी पतंग”…

– रचना : साधना आठल्ये🌿
कटी पतंग
बरी वाटली