कधी वाटते स्वैर फिरावे
रानामधूनी मुक्त मोकळे
अनवाणी पायात रूतावे
दव भरलेले गवत धाकले
उभ्या कड्याच्या खांद्यावरूनी
उडी घेतसे पीठूरपाणी
दरडीखाली दडून बसल्या
गुरख्या पोरी चिमण्यांवाणी
हिरवी हिरवी ही वनराई
रूपात आपुल्या हरकून जाई
निळ्या आभाळी निळी निळाई
निळ्या तळ्यावर निळीच साई
शीळ घालतो कुणी वल्हरी
कुणी भैरवी गातच राही
सुतार पक्षी ठेका धरतो
झांज वाजवी खारूताई
घळईमधुनी खेळ खेळती
घारी,खारी,सरडे,बगळे
शेवाळी पाण्यात पावले
स्पर्ष मखमली सूख वेगळे
— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
👏👏👏 छान रचना