करूया जागर आईचा हो अंबामातेचा
समुळ संकटनाशिनी आई आदिशक्तीचा…
उधे ग अंबे उधे..
उधे ग अंबे उधे..॥१॥
महिषासुरमर्दिनी ही माता चांगुणाच सद्गुणी
बसली जाऊन गडावरी हो खोड हिची ती जुनी
भक्तांना पावक ही माता असे तिचा राबता
करूया जागर आईचा, जागर अंबामातेचा
उधे ग अंबे उधे …
उधे ग अंबे उधे…॥२॥
कोल्हापुरी बैसली तू माता माहुरगडावरी
सप्तशृंगगडावरी तू मारिलास ग अरी
अनेक रूपे माते तुझी ग दिसती ओवाळीता
करूया जागर आईचा जागर अंबामातेचा
उधे ग अंबे उधे…
उधे ग अंबे उधे….॥३॥
गौरी पार्वती महालक्षुमी काली सरस्वती
धावून गेली देवांसाठी अशी तुझी महती
संकटहारिणी पाव मला ग देई आई सद्गती
कर पहारा दुनियेवरती कर बाई जागता
करूया जागर आईचा जागर अंबामातेचा
उधे ग अंबे उधे..
उधे ग अंबे उधे….॥४॥

— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800