महिलांनी सुरू केलेली डोंबिवली येथील क्षितिज संस्था गेली २५ वर्ष कार्यरत आहे. संस्थेने मतिमंद मुलांची शाळा, ठाकूरवाडी डोंबिवली पश्चिम या विभागात सुरू केली.
अवघ्या ५ मुलांपासून सुरू झालेल्या शाळेत आज १०० विद्यार्थी शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत.
संस्थेला फक्त ३० मुलांसाठी अनुदान मिळते. त्यामुळे इतर मुलांचा, शाळेचा सर्व खर्च संस्थेला करावा लागतो आणि आजपर्यंत आपल्या मदतीने हे शक्य झाले आहे.
शाळेची १८ वर्षांवरील मुले दरवषी सणाप्रमाणे लागणाऱ्या वस्तू बनवून त्यांची विक्री करतात.
ऑर्डर प्रमाणे हार, तोरण, कंठी, तिळगुळ लाडू, भेटवस्तू , चकली थालीपीठ भाजण्या, मुखवास बनविल्या जातात. तसेच फुलांचे गुच्छ, आकर्षक वेगवेगळ्या फुलांच्या परड्याही बनविल्या जातात. तसेच छोटे व मोठे आकाश कंदील यांची पण ऑर्डर घेतली जाते.
या सर्व वस्तू शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनविल्या जातात. संस्थेने याही वर्षी दिवाळी निमित्त ४ पणत्या, २ उटणे पाकीट, रांगोळीचे ४ रंग व पांढरी रांगोळी असे एक किट तयार केले आहे. किंमत फक्त १२०/- रू आहे.
आपली ऑर्डर मिळाल्यावर या मुलांना काम मिळेल व ते आनंदी राहतील हाच प्रामाणिक संकल्प करत आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना संपर्क करून जर ऑर्डर मिळवून दिली तर संस्था आपली ऋणी राहील. आपलाही सामाजिक कार्यात हातभार लागेल.
संपर्कासाठी फोन नं: ९९८७३७११२३,
९७०२१९९५८१, ९८६७३८३५६६
संस्था आपल्या सहकार्याची वाट पाहत आहे.
– टीम एनएसटी. 9869484800