आज, ४ फेब्रुवारी. जागतिक कर्करोग जागृतीदिन. या निमित्ताने वाचू या पुढील कविता.
– संपादक
दिन चार फेब्रुवारी
विश्व कर्करोग दिन
नको पडावया बळी
असे जगूया जीवन
कर्क मृत्यूचे प्रमाणं जगभरा मधी मोठे प्रतिबंध रोगाला या आव्हान हे नाही छोटे
संशोधन प्रतिबंध
उपचार शिस्त पाळा
अशा कृतीतून घालू
आजार, मृत्युला आळा
दिन विश्व कर्क रोग
न एकला जागृतीचा
नित्य कार्यक्रम व्हावा
कर्कातूनी बचावाचा
जे बाधित कर्क रोगी
पाठिंबा त्यांना देऊया
कर्क बरा होतो नक्की
खात्री आज पटवूया
— रचना : सुधीर शेरे. डोंबिवली (पूर्व)
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800