“शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहचविणारे शिक्षण महर्षि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील” यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त….
मला मा. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांनी सुरु केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा खूप खूप अभिमान वाटतो !
माझी शैक्षणिक जडणघडणच रयत शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्यालय चास कमान (राजगुरू नगर -पुणे) आणि याच संस्थेच्या अण्णासाहेब आवटे काँलेज, मंचर (पुणे) झाली.
माझे शिक्षण माझ्या जन्म गावी चास कमान येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात इयत्ता ८ वी ते इयत्ता ११ वी पर्यंत झाले.
नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ५५ एकर जमिनीतील मंचर येथील याच संस्थेतील अण्णासाहेब आवटे काँलेज मंचर येथे एम्.ए शिक्षण घेत असताना मला चांगला अनुभव आला. त्यावेळी १९८१-८२ मध्ये काँलेज मध्ये गँदरिंगचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉ. कर्मवीर भाऊराव पाटलांचे मानस पुत्र आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बँरिस्टर मा.पी.जी पाटील होते. काँलेजचे प्राचार्य आप्पासाहेब पानवळ, प्राध्यापक संभाजी राव देसाई,
प्रा डॉ. आनंद घाटगुडे, प्रा.एस.टी. मदनाईक इ. प्राध्यापक होते.
बँरिस्टर पी.जी पाटील म्हणजे, मूर्ती लहान पण कीर्ती महान ! ते प्राचार्य आप्पासाहेबांचे खास मित्र होते. बँरिस्टर पी.जी. म्हणजे पांडुरंग गणपती पाटील म्हणाले, मी संस्थेच्या वसतिगृहात असताना पहाटे अण्णा मुलांना अभ्यासाठी उठवायला यायचे त्यावेळी मुलं त्यांना नावं ठेवायचे. त्यावेळी अण्णा मुलांना म्हणायचे, भल्या पहाटे प्रसाद मला नका हो देऊ !(दुपारी दिला तर चालेल.) अण्णा पी.जीं. ना म्हणजे पांडूला म्हणाले, तू तरी माझे ऐक ! तेच पी.जी.पाटील लंडनला जाऊन पहिल्या नंबरने बँरिस्टर होऊन रयत शिक्षण संस्थेत सातारा येथे, इंग्रजीचे प्राध्यापक पदावर त्यांनी सेवा सुरु केली. यातून अण्णांची मुलांविषयी शिक्षणा ची तळमळ दिसून येत असे.
पद्मविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणत,
“जेवढे माझ्या दाढीला केस आहेत त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी या रयत शिक्षण संस्थेतून उच्च शिक्षण घेऊन आपल्या भारत देशाची सेवा करतील !” आणि पुढे तेच सत्य झाले.👏
मला माझ्या वडिलांचा, स्वर्गीय ज्ञानेश्वर केशवराव कासार (सासवडे) यांचा अभिमान वाटतो की, चास कमान येथील स्वतःची जागा त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेसाठी बक्षीस दिली. माझे वडील, आम्ही सर्व मुले त्यांना भाऊ म्हणून हाक मारत असत, तर गावातील सर्व लोक त्यांना “माऊली” याच नावाने हाक मारत कारण त्यांच्या नावात व कार्यात माऊली होती, त्यांची नाळ बहुजन समाजाशी जोडली होती, गावात हायस्कूल नव्हते. रयत शिक्षण संस्थेचे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हायस्कूल होणार हे ऐकून त्यांना कमालीचा आनंद झाला.

प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःच्या घराची जागा शाळेला दिली. कारण या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, त्यांनी मोठे व्हावे हा त्यांचा उदात्त हेतू होता.
माझ्या वडिलांचा पिढीजात बांगड्या भरण्याचा (कासार) व्यवसाय होता. अन्य काहीही उत्पन्न नाही. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट. गावोगावी सायकलवर, घोड्यावर तर कधी पायी फिरुन वडिलांना व्यवसाय करावा लागे.
मुले मोठी होऊ लागली तसा कुटुंबाचा खर्च वाढला. परंतु स्वाभिमानी वृत्तीच्या माझ्या वडिलांनी कधी कोणापुढे हात पसरले नाहीत, तर आपली जागा शैक्षणिक सारख्या पवित्र क्षेत्रास देऊन त्यांनी व माझे बंधू दादा यांनी कृतार्थ मानले. या जागेत आज हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन देशाची सेवा करत आहेत.
“कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिचय”
जन्म : २२ सप्टेंबर १८८७
कुंभोज, ता. हातकंणगले जिल्हा कोल्हापूर.
वडील : श्रीपायगोंडा देवगोंडा पाटील
पत्नी : लक्ष्मीबाई पायगोंडा पाटील
रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह : वटवृक्ष
कर्मवीरांची चतुःसुत्री :–
१. स्वावलंबन
२. स्वाभिमान
३. स्वाध्याय
४. समता
विविध शैक्षणिक प्रयोग :–
* स्वावलंबी शिक्षण
* श्रमसाफल्य
* कमवा व शिका
शैक्षणिक कार्य : —
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९०९ मध्ये सांगली जिल्ह्यातील दूधगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कराड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२१ मध्ये नेर्ले ता. वाळवा या ठिकाणी वसतिगृह स्थापन करण्यात आले. पुढे १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्यालयाचे सातारा या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले व सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे मिश्र वसतिगृहाची स्थापना करण्यात आली आणि याच वसतिगृहाचे २५ फेब्रुवारी १९२७ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते थोर समाज सुधारक ‘राजर्षी शाहू महाराज वसतिगृह’ असे नामकरण करण्यात आले.
१९३२ साली उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी युनियन बोर्डिंग हाऊसची पुणे या ठिकाणी स्थापना केली. ६ मे १९३५ साली रयत शिक्षण संस्थेचे ‘द सोसायटीज रजिस्ट्रेशन १८६०’ नुसार रजिस्ट्रेशन करण्यात केले. १९३६ साली सातारा येथे मा. रा.ब. काळे यांच्या नावाने पहिली मराठी शाळा सुरू केली.
१९३८ मध्ये यवतेश्वर येथे रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवली जाणारी पहिली व्हालंटरी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. पुढे अशाच ५७८ प्राथमिक शाळा डोंगराळ व दुष्काळी भागातील खेडेगावांमध्ये सुरू केल्या. १९४० साली सर्व स्तरातील गरीब विद्यार्थ्यासाठी ‘महाराजा सायजिराव गायकवाड’ यांच्या नावाने मोफत व वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा सुरू केली. त्यानंतर अशाच १०१ माध्यमिक शाळा सुरू केल्या.
१९४२ साली मुलींच्या शिक्षणासाठी मिश्र वसतिगृह स्थापन केले.
दिवाळी सणाला वसतिगृहातील मुलांना जेवण नव्हते त्यावेळी अण्णा बाहेर गावी गेले होते, अशा वेळी लक्ष्मीबाई या माऊलीने आपल्या लग्नाचे मंगळसूत्र विकून मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली.
महान त्या माऊलीचे कार्य !👏प्राथमिक स्त्री शिक्षिकांसाठी ‘जिजामाता अध्यापिका विद्यालय’ या नावाने ट्रेनिंग कॉलेज सुरू केले.
१९४७ साली ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नावाने उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय सातारा येथे सुरू केले. ‘संत गाडगे महाराज महाविद्यालय’ हे कराड तालुक्यात १९५४ साली सुरू केले. तसेच १९५५ साली ‘मौलाना आझाद कॉलेज ऑफ एजुकेशन’ हे पहिले प्रशिक्षण महाविद्यालय सातारा येथे सुरू केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शिक्षण संस्थांना प्रेरक व मार्गदर्शक ठरेल.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी भारत सरकारने २६ जानेवारी १९५९ रोजी ‘पद्मभूषण’ हा किताब बहाल करून त्यांचा गौरव केला. कर्मवीर पुणे येथील ससून रुग्णालयात अँडमिट असताना ५ एप्रिल १९५९ पुणे विद्यापीठाने ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला.
जगणे- मरणे हा सृष्टीचा अटळ नियम आहे पण मृत्यूनंतरही लाखो जनमानसांच्या मनांमध्ये जीवंत राहणे म्हणजे खर्या अर्थाने जीवन सार्थकी लावणे असते.
शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध, शिक्षण म्हणजे आयुष्याचं सोने करणारा परीस असे हे शिक्षण तळागाळातील उपेक्षित जनमानसापर्यंत पोहचवणार्या या महान शिक्षण महर्षींचे निधन ९ मे १९५९ रोजी ससून हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी झाला आणि १० मे १९५९ रोजी ‘चार भिंती’ (गांधी टेकडी) सातारा येथे अग्निसंस्कार करण्यात आले. असे असले तरीही कर्मवीरांचे विचार आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श यांच्यानुसार रयत शिक्षण संस्थेची वाटचाल सुरूच आहे. ऑफ एजुकेशन’ हे पहिले प्रशिक्षण महाविद्यालय सातारा येथे सुरू केले.
वृक्ष आपली मूळे मातीत खोलवर नेते व त्याच वेळी आकाशाला भिडण्याचे ही काम करीत असते. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्था ही सुध्दा अण्णांच्या विचारांचा जागर हा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवित तर आहेच पण त्याचबरोबर जागतिकीकरण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नवनवीन शैक्षणिक धोरणे राबवून प्रगतीचा आलेख उंचावत आहे.
अशा पद्मभूषण शिक्षण महर्षि डॉ. कर्मवीर भाऊरावांना पाटील यांच्या १३४ व्या जयंती निमित्त मनापासून त्रिवार अभिवादन !👏👏👏👏👏

– लेखन : कृष्णकांत सासवडे, सेवानिवृत्त शिक्षक
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
आदरणीय सासवडे सर
आपण शालेय जीवनातील सोनेरी गतस्मृतीना ऊजाळा दिला.
मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेतून शालेय शिक्षण व महाविदखालीयन शिक्षण शिखळ ता खंडाळा जि सातारा येथे घेतले.
आपल्या पिताश्रीनी शाळेला स्वतःची जागा देऊन फार मोठा त्याग केला आहे. संबधीत जागेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले यांचा मला अभिमान आहे.
आपले व आपल्या वडिलाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
स्वावलंबी शिक्षण हेच आपले ब्रिद्र आहे.
श्री. संदिप रांगोळे.
माननीय श्री कृष्णकांत सासवडे सर यांनी अतिशय छान प्रकारे शब्दांकित करून मांडलेला जीवनपट डोळ्यापुढे उभा राहतो .
सरांचे वडील स्वर्गीय श्री. ज्ञानेश्वरजी केशव सासवडे यांनी स्वमालकीची जमीन शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी रयत शिक्षण संस्थेला दिली ही खरोखरच समाजासाठी उपयोगी आणि सर्वांना निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे. सरांच्या वडिलांची शिक्षणाप्रती दूरदृष्टी या मधून दिसून येते त्याच प्रमाणे सरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून स्वतःचे आणि कुटुंबाचे पर्यायाने समाजाची प्रगती करण्याचं काम सरांनी केलेला आहे धन्यवाद सर आणि आपणास पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा……
श्री. प्रमोद राठोड
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श शिक्षक मा. कृष्णकांत सासवडे सर यांचे दिवंगत पिताश्री स्व.ज्ञानेश्वर केशव सासवडे यांची कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही चासकमान या आपल्या गावामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वतःची वडिलोपार्जित जागा शाळेसाठी बक्षिस दिली त्यामुळे गांव व समाज याप्रती दातृत्व, शिक्षणाबद्दलची अस्था व प्रेम दिसून येते.शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये योगदान देऊन त्यांनी सेवा व समर्पणभाव दाखवून एक आदर्श निर्माण केला होता… त्यांच्या या अलौकिक कृती आणि विचारांना शतशः नमन करतो. —- नरेंद्र बंड सर
महत्वाचे योगदान दिले आहे. अशा व्यक्तींना नमन
महत्वाचे योगदान दिले आहे
Feel proud about you and your whole family for having such a great noble family history.your father’s zest for education depicted even if not from rich family they served a lot for students education .Salute to their great deed.
कर्मवीर आणि आम्ही या लेखातील मला भावलेला प़संग म्हणजे सासवडे सरांच्या वडीलांचे शैक्षणिक कार्यातील अत्युच्च योगदान. स्वतः निर्धन असूनही शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून स्वतः च्या घराची जागा शाळेला दिलेल्या दानातून त्यांची औदार्यता आणि तळागाळातील वंचित बहुजन समाजाविषयी तळमळ दिसते . हाच वारसा सरांनी आपल्या परीने चालू ठेवला. त्यांच्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा.
श्री नामदेव जाधव
माननीय श्री कृष्णकांतजी सासवडे सर यांचे वडील कै.ज्ञानेश्वर सासवडे (भाऊ) यांनी आपली स्वतःची गरिबी असतानाही अनेक प्रकारचा संघर्ष करतात खेडोपाडीच्या गावी जाऊन कधी सायकलवर तर कधी घोड्यावर जाऊन बांगड्या विकण्याचे काम केले. त्या काळात बहुजनांच्या शिक्षणाची व दारिद्र्याची दुरावस्था त्यांनी जवळून पाहिली होती. ज्यावेळी भाऊंना समजले की आपल्या चास सारख्या दुर्गम आदिवासी भागात रयत शिक्षण संस्था हायस्कूल काढू इच्छित आहे त्यावेळी त्यांना जागेची उपलब्धता नसल्याने त्यांचा बेत मागे घेण्याच्या तयारीत संस्था होती. अशावेळी गावातील दानशूर श्रीमंत लोकांच्या बरोबर भाऊंनी ही स्वतःच्या घरबांधनी साठी घेतलेली जागा रयत शिक्षण संस्थेला दान दिली. महान कार्य फक्त एक दूरदृष्टीचा अभ्यासू माणूसच करू शकतो. यावरून सासवडे घराण्याची सामाजिक जाणीव किती प्रबळ आहे हे पाहायला मिळते. भाऊंनी त्याकाळात ओळखले कि बहुजनांच्या दीनदलित गरिबांच्या उद्धाराचा एकच मार्ग तो म्हणजे शिक्षण. हे ओळखून त्यांनी आपली जागा बहुजनांच्या शिक्षणासाठी उभा राहणाऱ्या माध्यमिक शाळेला दान दिली… भाऊ आपल्या उदारतेला, दूरदृष्टीला आणि आपल्या घराण्याच्या या औदार्याला लाख लाख सलाम
माननीय श्री कृष्णकांतजी सासवडे सर यांचे वडील कै.ज्ञानेश्वर सासवडे (भाऊ) यांनी आपली स्वतःची गरिबी असतानाही अनेक प्रकारचा संघर्ष करतात खेडोपाडीच्या गावी जाऊन कधी सायकलवर तर कधी घोड्यावर जाऊन बांगड्या विकण्याचे काम केले. त्या काळात बहुजनांच्या शिक्षणाची व दारिद्र्याची दुरावस्था त्यांनी जवळून पाहिली होती. ज्यावेळी भाऊंना समजले की आपल्याच सारख्या दुर्गम आदिवासी भागात रयत शिक्षण संस्था हायस्कूल काढू इच्छित आहे त्यावेळी त्यांना जागेची उपलब्धता नसल्याने त्यांचा बेत मागे घेण्याच्या तयारीत संस्था होती. अशावेळी गावातील धन्यवाद दांडग्या श्रीमंत लोकांच्या बरोबर भाऊंनी ही स्वतःच्या घराबांधनी साठी घेतलेली जागा रयत शिक्षण संस्थेला दान दिली महान कार्य फक्त एक दूरदृष्टीचा अभ्यासू माणूसच करू शकतो. यावरून सासवडे घराण्याची सामाजिक जाणीव किती प्रबळ आहे हे पाहायला मिळते. भाऊंनी त्याकाळात ओळखले कि बहुजनांच्या दीनदलित गरिबांच्या उद्धाराचा एकच मार्ग तो म्हणजे शिक्षण. हे ओळखून त्यांनी आपली जागा बहुजनांच्या शिक्षणासाठी उभा राहणाऱ्या माध्यमिक शाळेला दान दिली… भाऊ आपल्या उदार तिला दूरदृष्टीला आणि आपल्या घराण्याच्या या अवताराला लाख लाख सलाम