ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, जेष्ठ निसर्ग चित्रकार कै.शिवाजीराव तुपे, चित्रकार प्रा.सुहास बहुलकर, चित्रकार प्रा.विश्वनाथ साबळे, लेखक व समिक्षक रवीप्रकाश कुलकर्णी, कलासमिक्षक दीपक घारे, ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, साहित्यिक व लेखक डाँ. पांडुरंग भानुशाली, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक, पत्रकार, लेखक देवेंद्र भुुजबळ आदि मान्यवरांनी गौरवलेला ‘महान भारतीय चित्रकार’ हा अमोल कलाग्रंथ आहे.
भारतातल्या अनेक कला रसिक, चित्रकार आणि कला विद्यार्थ्यांनी संग्रहीत केलेल्या या कला ग्रंथाला संदर्भमूल्य लाभलेले आहे. उमेदीच्या चित्रकारांसाठी भूतकाळात डोकावयाचे असेल तर यासारखा उत्तम संदर्भ ग्रंथ शोधूनही सापडणार नाही. आपल्या महान चित्रकारांची परंपरा उलगडून दाखवणारा माहितीपूर्ण कलाग्रंथ मराठीत प्रथमच प्रसिद्ध झाला आहे.
या ग्रंथात आहे संपूर्ण भारतातल्या १५० जुन्या, मान्यवर आणि महान चित्रकारांची सचित्र माहिती अतिशय तरलपणे देण्यात आली आहे. व्यक्ति चित्रणापासून निसर्गचित्रांपर्यंत, अमुर्त चित्रांपासून ते वास्तववादी चित्रांपर्यंत, ग्रामिण जीवनापासून ते स्त्री जीवनापर्यंत, देवादिकांच्या धार्मिक चित्रांपासून ते सामाजिक लोकजीवनांपर्यंत, बोधचित्रापासून ते मुखपृष्ठ सारे काही खूपच आकर्षकपणे मांडलं आहे. विविध रंग माध्यमांच्या वेगवेगळ्या चित्रशैली आणि चित्रकला क्षेत्रातले जवळपास सर्वच चित्र प्रकार या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत.
जेष्ठ चित्रकार आणि मुंबईच्या प्रख्यात जे जे स्कुल ऑफ आर्ट्स मधील निवृत्त प्राध्यापक सुभाष पवार यांनी अनेक वर्षांच्या अथक संशोधनातून हा ग्रंथ साकारला आहे. अन्यथा संशोधन, दस्तऐवजीकरण ही गोष्ट आपल्याकडे फार दुर्लक्षित आहे.
आपल्याही संग्रहात असावा असा संदर्भ ग्रंथ 8.5X12. / 130gsm या आकारात असून त्याची आर्ट पेपरवर छपाई करण्यात आली आहे.ग्रंथाची मूळ किंमत 1100 रुपये असली तरी तो 900 रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रंथ प्राप्तीसाठी
आपण प्रा. डाँ. सुभाष पवार,नवी मुंबई यांच्याशी
9869551661/ 8652024878 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.
– देवेंद्र भुजबळ.9869484800