Sunday, December 22, 2024
Homeसाहित्यकलियुग

कलियुग

वाट अवघी कंटकांची, रान विषारी फोफावले….
विस्तारा अधिर पिवळे तण हे, एक दुर्वांकूर उगवला पाहिजे !

घोषणा-प्रतिघोषणांचे नगारे, जन मानस हतबल होई….
वृथा वल्गनांच्या कल्लोळात ही, आश्वस्त आवाज पोहोचला पाहीजे !

खुषमस्करे माजले दरबारी अनेक, गोडवी अनाठायी गाती भाट….
टाळूनी दगडे ‘ गंडकी ‘ तली, खरा शालिग्राम वेचला पाहीजे !

अध्यात्म अधिष्ठान आपले जुने, वैराग्य वृत्ती सन्मानलेली….
संस्कृती वरी घाव येता परी, तलवार ही तळपली पाहीजे !

अस्त जाहला त्रेतायुगाचा, पुत्र करी आज्ञा पित्यासी आता….
राम कृष्ण ही झाले स्तंभित म्हणे, नव्याने कृष्णनीती रचली पाहीजे !

— रचना : उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. सद्य परिस्थिती मांडणारी कविता. उत्कृष्ठ शब्दांकन. दुर्वांकुर उगवलाच पाहिजे. तलवार सुध्दा तळपलीच पाहिजे.
    असेच सुंदर लिहीत रहा.

    मनोज पटेल – ठाणे

  2. तलवार ही तळपली पाहिजे
    उत्साह व स्फुरती वाढवणारी कविता

    अभिनंदन सरजी

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७