माळरान अन् खडकात बियाणे रुजविण्यासाठी माणसाला जरा जास्तच मेहनत घ्यावी लागते, पण त्या कष्टातून मिळालेले फळ हे लाजवाब असते. हे झाले मानवाच्या बाबतीत, पण आपण जर विचार केला तर निसर्गामध्ये विविध झाडे आहेत. या झाडांच्या बिया कळत नकळत मातीमध्ये पडतात. त्या मातीत रुजतात आणि नवीन झाड येते. पावसाळ्यामध्ये अकारण मातीच्या गर्भातून अनेक वनस्पती पालवतात. या वनस्पती खुरट्या असतात. काटेरी असतात आणि यातीलच काही वनस्पती मानवाला उपयुक्त असतात. तर काही मानवाला हानिकारक असतात.
सध्या पावसाळा सुरु आहे, माळरानावर शेतांच्या बांधावर तसेच डोंगर पायथ्याला रानभाज्या उगू लागल्या आहेत. या रानभाज्यांची ओळख आदिवासी मंडळींना किंवा आपल्या मागच्या पिढीला होती, परंतु निसर्गाच्या जवळ म्हणजेच आदिवासी भाज्यांची परिपूर्ण माहिती आदिवासी मंडळीना असते. मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उदा. विरार, मुरबाड, पनवेल, कल्याण, कर्जत याठिकाणी अशा प्रकारच्या रानभाज्या मिळतात. अशा भाज्या पिकवल्या जात नाही तर त्या माळरानावर मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. हल्ली काही आदिवासी बांधव या भाज्या विक्रीसाठी घेवून येतात, परंतु आपल्यातीलच काही लोकांना या रानभाज्यांची ओळख नसल्याने आपण घेणे टाळतो आणि पाल्यांनाही माहिती देणे लांबच राहते. अशा भाज्या ठराविक ऋतूमध्ये उपलब्ध असल्याने याविषयी अधिक माहिती नसते पालकांना याविषयी माहिती नसल्याने ते आपल्या पाल्यांना वळ, कुर्डू, घोळ, तेरा, तेभ्रे, मोह्फुले व फळे तेलपट, कोळू, लोत, भोकर, मोखा, भारंगी, काटे, माठ, कुसरा, कुळू या भाज्यांची माहिती कशी मिळणार म्हणूनच, ‘रोटरी क्लब ऑफ, डोंबिवली फिनिक्स व पर्यावरण दक्षता मंडळ आणि नूतन ज्ञानमंदिर कल्याण (पू)’ यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या शाळेत म्हणजेच नूतन मंदिर, कल्याण(पू) येथे रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक आर.टी. पाटील सर यांनी केले. यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाच्या सौ रुपाली शाईवाले यांनी प्रदर्शनाची मांडणी केली. या प्रदर्शनाला विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पालकांनी पावसाळी रानभाज्या प्रदर्शनात रानभाज्यांच्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात पालकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांपासून तरुणांना भुरळ पाडणाऱ्या फास्ट फूड सोबत जणू स्पर्धा स्पर्धा केली असे वाटत होते. यामध्ये पालकांनी विविध रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ बनविले होते. यामध्ये कर्टुलेचे मोमोज, कर्टुलेचे मोदक, चूक्याची चटणी, करडूची आवडी, त्याचप्रमाणे केळ फुलाचे व वाफळीचे थालीपीठ, कवळ्याच्या भाजीच्या वड्या, परवलाची बर्फी भारंगची भाजी टाकळ्याचे पराठे शेवग्याच्या पानांचे चीज बॉल असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून पालकांनी या स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद देऊन आपल्या रानभाज्यांच्या पदार्थांचे महत्त्व विद्यार्थी पालक यांना पटवून दिले.

या स्पर्धेतील विजेत्या पालकांना “रोटरी क्लब ऑफ डोंबिवली फिनिक्स” यांनी बक्षिसे देऊन कौतुक केले. रानभाज्यांचा खाल्याने शरीराला होणारे फायदे या भाज्यांचे महत्व यांची ओळख औषधी गुणधर्म याबाबत परिपूर्ण अशी माहिती देवून त्यांच्या शंकांचे निरसन केले
पाककला स्पर्धेत लाभलेल्या परीक्षक सौ शर्वरी कळंगे व सौ मिलन मांजरेकर यांनी केले. जंक फूड खाल्यावर शरीराला कशा इजा होते सध्याची आपली जीवन शैली ही धावपळीची आहे आपले जर स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर शरीरात रोग प्रतिकारक शक्ति वाढली पाहिजे यासाठी अशा भाज्या चे सेवन करणे आवश्यक आहे.
पर्यावरण दक्षता मंडळाने त्या भाजीचे शास्त्रीय नाव कुल, संस्कृत नाव, वनस्पती कशी ओळखावी, त्यांचे औषधी गुणधर्म व ती भाजी बनविण्याची पाककृती इत्यादी माहितीही दिली. त्यामुळे पालकांना ती माहिती बाजारातून आणल्यावर कशी करावी हा प्रश्न पडणार नाही.
या प्रदर्शनातील रानभाज्या या मामनोली परिसरातून आणल्या गेल्या. पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या जास्त रुचकर तर असतातचं शिवाय यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे असल्याने शरीरास पौष्टिक देखील असतात. या रानभाज्या निसर्गाची देणगी आहे. मानवाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी आपणास अशा भाज्यांविषयी लोकजागृतीची फार आवश्यकता आहे. या रानभाज्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर करावा यासाठी या शाळेने केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. दरवर्षी अशा प्रकारचे पावसाळी रानभाज्यांचे प्रदर्न भरवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रानभाज्यांची माहिती पोहचविण्याचा शाळेचा मानस आहे. रानभाज्या प्रदर्शन व पाककला महोत्सव हा उपक्रम जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शाळेत आयोजित करण्यात आला होता. शाळेतील सर्व शिक्षक कार्यक्रमांस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामदास लोखंडे व सह-शिक्षिका श्रीमती सुलभा परदेशी यांनी केले.
शाळेच्या सह-शिक्षिका सौ श्रद्धा सावंत भोसले यांनी शाळेतर्फे आभार मानले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर संस्कृतीक प्रमुख सौ रेणुका जोईल व ज्योती चौधरी यांनी कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी केली. यात विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
यांमध्ये महत्वाचे म्हणजे जैवविधतेचा एक भाग असलेल्या या रानभाज्या ज्या जंगल परिसरातून आपल्याकडे येतात ते जगलं जपण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी कटिबद्ध असायला हवे तरच या रानभाज्यांचा चव पुढील पिढीस चाखता येईल.

— लेखन : आस, कल्याण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
