तुमची आमची कहाणी असते
अंतःकरणाची वाणी असते
शब्दरूपी काव्याची माळ असते
कवी मनाची नाळ असते
मोहून टाकणारी माया असते
सुंदर वृक्षाची छाया असते
ऊन सावलीचे खेळ असते
मुक्त विचारांची वेल असते
मन वाचणारी किमया असते
जादुई ही दुनिया असते
अद्भुत विलक्षण जग असते
अविस्मरणीय क्षण असते
आठवणींची शिदोरी असते
भावनांची होडी असते
कधी हसवणारी तर रडवणारी असते
हृदयावर राज्य करणारी असते
कल्पना अनुभवांची जोड असते
विचारांना न कोणती तोड असते
पंखांना उडण्याचे बळ असते
मानसिक आधाराची चळवळ असते
कविता कशी, कधी, केंव्हा, कुठे सुचते……
हे मात्र एक कोडे असते…..
— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️c9869484800.