“शब्द कवडसा साहित्य परिवार, परभणी” आयोजित ‘जागर कवितांचा’ या कविसंमेलनाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्रो.डॉ.एम.डी. इंगोले म्हणाले की, कविता म्हणजे मानवी भावना आणि अनुभवांचे प्रकटीकरण होय.
यावेळी त्यांनी त्यांची ‘मां सावित्री की संतानें’ ही कविता सादर केली
दुसऱ्या सत्रात सुमन भगत, नांदेड़ यांनी,
‘हा जन्म आहे माणसाचा,
माणसा सारखे जगून घ्या’
ही कविता तर परभणीच्या कु.साक्षी कदम हिने ‘जखमा’ ही कविता सादर केली.

प्रा.गोरख धाकपाडे यांनी पावसावरची कविता गाऊन दाखवली. शिल्पा साळवे ह्यांची ‘स्त्री परिवर्तनवादी कविता’ दाद देऊन गेली. युवा कवी जाधव, समाज भूषण पुरस्कार प्राप्त जिरवणकर मैडम, छः.संभाजी नगर येथील महामुने सर यांनी कथा कथन केले.
जालन्या वरुन आलेले खरात सर, पडघन सर यांनी कवी लेखकांना उद्देशून ‘उठा कवीनों लेखकांनो तुम्हाला तर जागणे आहे’, ॲड. खरात यांनी ‘आल्या पावसाच्या सरी’ ॲड. विजय कस्तुरे यांनी,
‘द्या दवंडी गावात मला मुलगी झाली।
सार्या जगाची दौलत माझ्या ओटित आली’ ;
‘चल सखे तरुच्या सावलीला।
आपल्या मनाची दालने खोलू जरा।’
या कवितांनी श्रोत्यांची मने जिंकली. या सत्राच्या अध्यक्षपदी अध्यक्ष वकील विजय कस्तुरे, जालना हे होते.
कवडसा चे अध्यक्ष ॲड. शंकर कदम यांनी आपल्या बहारदार शैलीतून सूत्र संचालन केले. संयोजक नाथराव लटपटें यांनी आभार मानले.
— टीम एन एस टी ☎️ 9869484800