आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने
२ विशेष कविता…
भारतपुत्रा जाग
शत्रू आपल्या दारी ठाकला
भारतपुत्रा जाग
कशी लागली पहा तरी रे
हिमालयाला आग .. १..
शहीद जाहले लाल कितीक ते
भारतमातेचे
का दैवाने तिला दाविले
डोंगर दुःखाचे .. २..
निष्पाप जीवांचा बळी घेऊनि
नराधमांनी त्या
काय साधले , काय मिळविले
केवळ निर्जीव काया .. ३..
अरे बांधवा, मम रक्ताचा
टिळा तुला लावते
भारत भू चे रक्षण करण्या
राखी तुला बांधिते .. ४..
शपथ तुला तू उठ सत्वरी
जाग बांधवा जाग
कशी लागली पाहा तरी रे
हिमालयाला आग .. ५..

– रचना : वीणा पवार
तिरंगा
रंगी तीन रंगलेला
झेंडा आमची शान
करण्यास रक्षा याची
शूरवीर देतो प्राण
त्याग सुखाचा करुनी
उभा निर्भय जवान
देशासाठी येतो कामी
त्याचे जीवन महान
देण्या स्वतंत्र देशास
वीर लढले महान
सैनिकाच्या या त्यागाची
आपल्यास हवी जान
देऊ साथ एकमेका
तिरंग्याचा हा सन्मान
हेच आमचे जीवन
देशसेवा हीच शान
नभी तिरंगा डोलता
आम्हा वाटे अभिमान
व्हावे विकास देशाचे
मनी जागे स्वभिमान

– रचना : पुनम सुलाने
फारच छान