Monday, February 16, 2026
Homeबातम्या‘कवितेच्या जन्मावेळी’ प्रकाशित

‘कवितेच्या जन्मावेळी’ प्रकाशित

गोमंतकीय कवी, पत्रकार व साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या ‘कवितेच्या जन्मावेळी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर यांच्या हस्ते हल्लीच सिमला येथे
करण्यात आले.

क्षीरसागर यांच्या कविता सर्वसामान्यांना समजण्याजोग्या आहेत. सोप्या भाषेतील व विविध छंदातील कविता जनसामान्यांच्या लक्षात राहतात, असे प्रशंसोद्गार राजेंद्रजी आर्लेकर यांनी काढले.

या प्रसंगी मसूर जि. सातारा येथील गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, कवयित्री दीपा मिरिंगकर, चित्रा क्षीरसागर, आसावरी मोहनराव कुलकर्णी, अपूर्वा ग्रामोपाध्ये यांच्यासह मा. राज्यपालांचे प्रसिद्धी प्रमुख जयंत शर्मा आणि वरिष्ठ कमल राणा आदी उपस्थित होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11