जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने कवितेवरील कविता !
कविता दिनाच्या शुभेच्छा💐
लय मात्रा वृत्त अलंकारिक शब्द
हे सर्व मिळून होते कविता
मनातील भावना व्यक्त करत
हळूवार मनाची कवाडे उघडून बनते, ती कविता
अबोल डोळ्यांतून दिसते
ती हळूच लयीत व्यक्त होते, ती कविता
हळव्या मनाचा कोपरा
आठवणींच्या पसाऱ्यात
शब्दांनी शब्दांशी खेळ मांडतो तेव्हा होते ती कविता
माहेरवाशीण लेकीला
अंगणात पिंगा घालणारा
वारा अलवार माहेरी घेऊन जातो तेव्हा रुजते ती कविता
प्रेम व्यक्त करताना
न बोलताच नयनांतूनच समजले जाते
नकळतच ओठांवर हसू उमटते तेव्हा होते ती कविता
पती पत्नीच्या मिलनाची ओढ लावणारा विरह जेव्हा छळतो
तेव्हा हृदयातून आलेली भावना बनून जाते ती कविता
मातृत्वाचे लेणे निसर्गाने दिलेल्या आईने
घेऊन कडेवर निजवताना आई
तिच्या ओठांतून निघते गीत होऊन जाते ती अंगाई
बनते ती वात्सल्याची कविता

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर