Homeसाहित्यकहर महायुध्दाचा…..

कहर महायुध्दाचा…..

जवा गन्या सांगे मन्याले
लेका काय ठाव हायका तुले
”देवा” शप्पथ सांगतो गड्या
कायच ठाव नाही मले !!

तिकडल्या देशामधी म्हने
महायुध्द सुरू झालेत
अमेरिका ईजराईल देशानं
इराणवर लई धमासान केले !!

काय सांगू गड्या तुले
तिकडं मोठा कहरच झाला
बॉंब मिसाईलच्या मा-यानं
सारा सत्यानाश झाला !!

मोठमोठ्या इमारतीतं
धडाधड कोसळल्या
हाल पाहवेना लोकांचे
सा-या मातीमोल झाल्या !!

अमेरिका इराणच्या वादात
सारे व्यवहार ठप्प झाले
पेट्रोल, गॅस, डिझेल
जगणं मुश्किल केले !!

गॅस, पेट्रोल संपले म्हून
लोकं रांगा लावून राह्यले
आता लोकं झाले बेभान
हॉटेलचे शटरही बंद झाले !!

दाढी बाबा सगळ्याईले
बोंबा मारून सांगुन राह्यले
कायच कायजी करू नका
परदेशातून गॅस पेट्रोल आणले.

राजाराम जाधव

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments