सोळा शृंगारापैकी पाचवा शृंगार म्हणजे काजळ..
नारी करी
तो शृंगार
काजळाने
थंडगार
तांबे चांदी
धातु वर
पाडताचि
हो सुंदर
बालकास
लावा तिट
द्रृष्ट जाई
होई निट
काजळाने
नेत्र कडा
छान वाहे
जल कडा
आई लावी
तिट भाळ
दूजी लावी
त्याचे गाल
शोभिवंत
बाळ दिसे
आई जडे
प्रेम पिसे
हल्ली वेड
फॅशनचे
काजळ न
लावायचे
चष्मा कधी
न तो लागे
हल्ली त्वरी
त्याच्या मागे
बालकाची
आई लावी
चष्मा नामे
गीत गावी
आजी बाई
लावतसे
बाळ गोड
दिसतसे

– रचना : सौ शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800