मी चालता रस्त्यावरती
पसरल्या कुणी या पायघड्या
गुलाब पाकळ्या झाकती तयांना
काट्यासमवेत सुकल्या काड्या ।
बोचले काटे मृदु पायांना
उमगले आयुष्य सुमनांचे
काट्यांवरती डोलता डोलता
हसुन सहन किती करायचे ।
काट्यांवाचुनी नसे आयुष्य
खंत मनी का धरायची
चालतांना टोचणारच ते
काळजी फक्त घ्यायची |
नसे माहिती काट्यांनाही
वेदना होतात बोचतांना
हरखुनी जातात पण ते
फुलांना बघुनी हसताना |
स्थायीभाव तयांचा आहे
टोचणे हेची प्राक्तन आहे
करावा पाय घट्ट फुलांनी
काटा स्वागतास आतुर आहे

– रचना : सुजाता येवले.
– संपादन : सौ अलका भुजबळ. 9869484800
Awesome
वाहवा! सुंदर, अर्थपूर्ण
काट्या वाचुनी नसे आयुष्य, खंत मनी का धरायची
चालतांना टोचनारच ते काळजी फक्त घ्यायची !
किती सुंदर रचना, फार सुंदर, अप्रतिम 👌👌
अतिशय सुंदर व अर्थपूर्ण कविता.
खूप छान
वास्तव दर्शविणारी रचना
👌
Awesome
Keep writing and share
Awesome
Ashich chan Kavita lihit ja
सुरेख
सुजाता ताई.. सुंदर रचना 🌹
झकास
खूपच छान
खूप छान सुजाता
खुप छान 👌
खुप छान!
खुप छान
वाह!
खुप छान!