डिसेंबर महिना आला की कोणाला काही तरी खास द्यावे, समाजाचे आपण काही देणे लागतो, त्या दृष्टीने काही तरी करावे.
असाच एक प्रयत्न करीत असतात सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई खंडाळे. त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या स्त्रियांनी मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्या ऐवजी पर्यावरण पूरक घरगुती कापडी पॅड वापरावेत यासाठी प्रयत्न करीत असतात. तसेच जिथे गरज असेल तिथे जाऊन अशा गरीब, गरजू महिलांना त्या व त्यांची अशय ही सामाजिक संस्था असे कापडी पॅड पुरवीत असतात. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सीमाताईंच्या ‘अशय सोशल गृप‘ चे “डिसेंबर गिविंग” चे हे सहावे वर्ष आहे. यावर्षी अजून काहीतरी थोडे वेगळे करावे असे त्यांनी ठरवले आहे. यासाठी यावेळी त्यांनी नीमखेडी, तालुका ,जिल्हा धुळे आणि मिरवडी व मेमनवाडी ता. दौंड, जिल्हा पुणे, ही दोन गावे दत्तक घेण्याचे ठरविले आहे.
ही दोन गावे सॅनिटरी पॅड च्या विळख्यातून मुक्त करण्याचा त्यांचा संकल्प आहे. एकदा वापरून फेकून दिले जाणारे सॅनिटरी पॅड, जे प्लास्टिक ने बनलेले असतात, हे रक्ताने माखलेले वापरून फेकलेले पॅड, आपल्या पृथ्वीला प्रदूषित करीत असतात. तसेच ते आरोग्यासाठीही खूप हानिकारक ठरतात.
या सगळ्यातून वाचण्यासाठी, जर आपण आरोग्यदायी, पर्यावरण पूरक असे शाश्वत पर्याय घेऊन पुढील वाटचाल सुरू केली तर येणाऱ्या पिढी साठी आपण एक छान, सुंदर असे पर्यावरण नक्कीच देऊ शकतो !
यासाठी आपण पुढील प्रमाणे मदत करू शकता.
या दोन्ही गावात पाळीच्या मासिक चक्रातून जाणाऱ्या
जवळपास ८७५ इतक्या मुली व महिला आहेत. त्या सगळ्यांसाठी ‘अशय ग्रुप कापडी पॅड’ ची सोय करणार आहे. प्रत्येकीला साधारण ४ तरी कापडी पॅड देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा ४ कापडी पॅड चा एक सेट, त्या मुली/महिला २ ते ३ वर्षे आरामात वापरू शकतील. आपण रोज आपले वापरलेले कपडे स्वच्छ धुवून, नीट उन्हात वाळवून पुन्हा वापरतो, त्याच पद्धतीने या कापडी पॅडस ची काळजी घेऊन त्या आपले आरोग्य सांभाळू शकतील.
त्यानंतर या महिला वापरलेले जुने कापडी पॅड जमिनीत पुरून टाकून किंवा जाळून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावतील. शेवटी कपडा आणि राख ही जमिनीत विघटितच होणार.
कापडी पॅड सारखा शाश्वत पर्याय या दोन्ही गावातील सर्व मुली व महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही देणगी रुपात संस्थेला मदत करू शकता.
देणगी देण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
Ashay Social Group
8577101008761
CNRB0008577
Canara Bank,
Sakri Road, Dhule.
UPI: 9421571219@upi
संपर्क क्र: 9930025807 / 9421571219
संस्थेची अधिक माहिती त्यांच्या पुढील वेब साईट वर आपल्याला पाहता येईल.
www.ashaysocialgroup.org
छोटीशी का असेना पण आपली ही मदत एक मोठे चांगले नवीन उदाहरण निर्माण करायला मदत करेल हे नक्की.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800