महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकार्याने इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एन.डी.खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलन अर्थात पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साहित्य मंदिर, वाशी येथे नुकताच संपन्न झाला.
सदरहु सोहळ्यास नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस.एन.पठाण, स्वराज्याचे सरसेनापती धनाजी जाधव यांचे थेट १० वे वंशज श्रीमंत संभाजीराव जाधव, इंडियन नेव्हीच्या लेफ्टनंट कमांडर शालिनी अग्रवाल (से.नि), सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने, प्रसिद्ध वकील तथा समाजसेवक अँड रमेश राठोड, कॅन्सर संशोधक व आंतरराष्ट्रीय शांती दूत डॉ.अमजद खान पठाण, जीएसटी च्या डेप्युटी कमिशनर यास्मिन मोलकर, वैजापूर चे तहसीलदार सुनील सावंत, प्रसिद्ध संगीतकार दत्ता कोळी उद्योजक अश्फाक मन्सुरी आणि समाजसेविका, गीता मुच्छाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजिका सलमा खान व प्रमुख समन्वयक डॉ.शैलेद्र पवार होते.
ईशान नगर, आरोही भागवत मुकेश कटारिया यांनी सादर केलेली गाणी व माही शाहु यांचे नृत्य या सर्व बालकांचे संगीतमय कार्यक्रम सदरहु सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.
अकलूज चे ह.भ.प जगन्नाथ महाराज खरात यांचे भारुडाने हास्याचे फवारे उडाले.
पुरस्कार वितरणाच्या दरम्यान काही पुरस्कार्थीनी सादर केलेली गाणी यामुळे पुरस्कार सोहळा अधिक रंजक झाला. डिजिटल पध्दतीने पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.
सदरहू सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस.एन पठाण यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर उपस्थित सर्व अतिथीना टीएमसी ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे निवडक सेवाव्रतींचा गोल्डन स्टार एक्सलन्स पुरस्कार व जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. सर्व पुरस्कार्थीनी फेटे बांधल्यामुळे सोहळा अतिशय देखणा वाटत होता.
या सन्मान महासंमेलनाचे सुरेख निवेदन डॉ.सौ.मधू निमकर यांनी केले तर सोहळ्याचे प्रास्ताविक एन.डी.खान केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईसा शेख, स्नेहा चांदोरकर, विजय भोसले, दीपक कदम, पनवेलच्या डी.डी.विसपुते महाविद्यालयाचे विद्यार्थी श्रध्दा पाटील, शितल चव्हाण, कोमल कांबळे, प्रियांका इंगोले, श्रृती सोलकर, स्नेहल मतकरी आणि रुतुजा डोंगरे यांनी परिश्रम घेतले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800