Home साहित्य कालचक्र

कालचक्र

0

दिन रात्र
कार्य व्हावे
रुप तुझे
निरखावे

सदा व्हावी
प्रातःकाळ
चंद्र कृपा
सायंकाळ

कालचक्र
ऋतू सहा
येती जाती
कार्य पहा

जन्म मृत्यू
पुन्हा व्हावा
पुनर्जन्म
तोचि यावा

प्रभाकरा
मध्यान्हात
तापवितो
त्या उन्हात

विसावण्या
वृक्ष छाया
शितलता
करी माया

धन आहे
करी माया
नसे धन
थिजे काया

धन जना
कमावतो
परिवार
विचारतो

धन असे
प्रेम करी
कंगालाच्या
नेत्री सरी

देह होई
तो जर्जर
अंती वाटे
तो दुर्धर

जन्म मृत्यू
कालखंड
संपताच
गात्र थंड

सृष्टी देई
नित्य क्रम
सूर्य चंद्र
कार्यक्रम

ऋतू रंग
बदलती
कालमान
समजती

शोभा कोठावदे

– रचना : सौ शोभा कोठावदे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version