समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास होणं आवश्यक असलं तरी मुळात समाज आरोग्यदायी असणं फार गरजेचं आहे. हे ओळखून समाजात आरोग्याविषयी जन जागृती निर्माण व्हावी, सर्व थरातील बंधू, भगिनींना प्रोत्साहन मिळावे या साठी
सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाच्या मध्यवर्ती मंडळाने रविवारी २ जानेवारी रोजी, आयोजित केलेल्या कासार मॅरेथॉन कार्यक्रमास सर्व कासार समाज बंधु-भगिनींनी सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, कासार मरेथॉनमुळे समाजाचे अस्तित्व सर्व दुर दिसुन आले. भविष्यात हि सर्व समाज बांधव यांनी असेच कायमस्वरूपी एकीचे बळ ठेवावे व मध्यवर्ती मंडळास ताकद द्यावी असे आवाहन करून त्यांनी ठिकठिकाणच्या आयोजकांचे व सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
या मरेथॉनला पुढीलप्रमाणे प्रतिसाद मिळाला.
ऊत्तर महाराष्ट्र :
1) जळगांव, 2) पाचोरा 3) सावदा 4) धरणगांव
5) चाळीसगांव 6) जामनेर 7) भडगांव 8) भुसावळ
9) फैजपुर 10) नाशिक 11) नाशिक पंचवटी 12) सिडको 13) नाशिक रोड 14) सिन्नर
15) ओझर 16) सायखेडा 17) वडाळी भोई
18) मनमाड शहर 19) सटाणा 20) अंतापुर 21) ताहराबाद 22) डांग सौंदाणे 23) नामपुर 24) मालेगांव शहर 25) कळवण
26) धुळे 27) साक्री 28) निजामपुर 29) सोनगीर 30) चिमठाणे 31) शिरपुर 32) अमळनेर 33) नंदुरबार 34) शहादा 35) तळोदा
पश्चिम महाराष्ट्र :
1) पुणे शहर 2) सातारा शहर 3) पिंप्री चिंचवड 4) सिंहगड रोड 5) कराड 6) राजगुरुनगर 7) भिगवन
8) राहता 9) शिर्डी 10) इचलकरंजी 11) पंढरपुर
12 ) खरवंडी कासार 13) अहमदनगर 14) बार्शी
मराठवाडा :
1) जालना 2) शिरुर कासार 3) औरंगाबाद 4) अंभई
5) अंधारी 6) सिल्लोड 7) परभणी शहर 8) सेलु
9) हिंगोली शहर 10) नांदेड शहर 11) उस्मानाबाद शहर 12) लातुर शहर 13) बीड शहर 14) माजलगांव 15) पुर्णा जंक्शन 16) ऊमापुर 17) हसनाबाद 18) जिंतूर 19) कळमनुरी
विदर्भ :
1) नागपूर शहर 2) अमरावती शहर 3) वर्धा
4) बुलडाणा 5) पुसद 6) अकोला 7) वाशिम
8) मूर्तीजापूर 9) अकोट 10) भंडारा 11) चंद्रपूर
12) सिंदखेड राजा 13) शेगांव 14) यवतमाळ 15) उमरखेड 16) कारंजा लाड 17) शिरपुर जैन 18) महुदा 19) मोवाड 20) पाढुर्णा 21) शिरसगांव (कसबा) 22) पळसबाग (नागपुर) 23) दर्यापूर
मुंबई :
मुंबई विभागात कलम 144 कलम लागु असलेमुळे मुंबईत झुम द्वारे आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कोकण :
1) महागांव 2) चरई 3) नवी मुंबई 4) सावर्डे 5) खेड 6) रायगड
विशेष म्हणजे मध्य प्रदेश मध्ये, इंदौर या ठिकाणी व दुबई येथेही मॅरेथॉन संपन्न झाले.
या मरेथॉनच्या निमित्ताने काही ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला. काही ठिकाणी अल्पोपहार, चहापाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
एकंदरीतच या अभिनव उपक्रमामुळे समाजात केवळ आरोग्य विषयक जनजागृती झाली नसून समाजात संवाद, संघटन, सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यास निश्चितच मोठा हातभार लागेल यात काही शंकाच नाही.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800