Home साहित्य काही अ ल क

काही अ ल क

1

१. पुन्हा एक “छपाक

तो तिच्या दिशेने बाटलीत कसले तरी द्रव्य घेवून वेगाने धावत येत होता. हे पाहताच तिने स्वतः च्या बचावाची केविलवाणी धडपड केली. पण तिचा घात झाला. आणि दुसऱ्या दिवशी “नकार ” दिल्यामुळे पुन्हा एक “छपाक” अश्या आशयच्या बातम्या झळकल्या.

२. वंदन

तेव्हा त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी शेणा मातीचा मारा सहन केला नसता तर आजही स्त्रियांच्या हातात “लेखणी नाही तर “फुकनी “असती . अश्या या सत्यशोधक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना शत शत वंदन..

३. प्रेमळ हाक

त्याच्या शेतात पिकं डोलाने डोलत होती. पण अवकाळी पावसामुळे सर्व पिकं जमीनदोस्त झाली . त्याच्या मनात आत्महत्येच्या विचाराने काहूर मांडले होते. पण मुलीच्या “बाबा “या प्रेमळ हाकेने तो भानावर आला.

४. सुख

लग्नाच्या दहा वर्षानंतर गोड बातमीची चाहूल लागली. दोघेही बाळाच्या आगमनाची स्वप्न रंगवू लागली. नुकत्याच जन्मलेल्या मुलीला उराशी कवटाळताच त्याचे डोळे पाणावले . प्रत्येक सुख हे पैशाने मोजता येत नाही, हेच खरं.

५. साथ

रस्ता ओलांडण्यासाठी तिची धडपड चालू होती. बघ्यांची भूमिका घेणाऱ्यांच्या गर्दीतून तो समोर आला. रस्ता ओलांडण्यासाठी त्याने तिचा जो हात धरला….तो कायमस्वरूपीच.

६. निरागस आनंद

आज ती आनंदाने उड्या मारत घरी येताच आईला बिलगून म्हणाली, ” आई मला गणितात १० पैकी ३ गुण मिळाले, मस्त ना “! यावर बालकमंदिरातील या बाल चेहऱ्यावरील निरागस आनंद आई मात्र कौतुकाने पाहतच राहिली.

— लेखन : सौ.आश्लेषा गान. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती:सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. 👌 खूप छान अ ल क कथा प्रस्तुत केली आहे. पहिल्या कथेत अबला स्त्री तर दुसऱ्या कथेत सबला नारी दर्शवली आहे. तिसऱ्यामध्ये शेतकऱ्याचे प्रतीक्षेनंतर निराश जीवन तर चौथ्या कथेमध्ये प्रतीक्षेनंतर आनंद. पाचव्या कथेत आधाराची साथ तर सहाव्या मधे निरागस भाव असे भावनिक दृश्य जाणवले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version