Home बातम्या भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

0

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. ₹१० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या व अन्य ४ चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

अन्य पुरस्कार

या वर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ₹ १० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक यासह दिला जातो.

चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप ₹ ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाच्या स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना मिळणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे ₹ १० लाख व ₹ ६ लाखांचे स्वरूप आहे.

हे सर्व पुरस्कार २५ एप्रिल २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत.

गझल नवाझ भीमराव पांचाळे यांचा वाढदिवस ३० मार्च रोजी होऊन गेला. त्यानिमित्ताने त्यांच्यावर लिहिलेली यश कथा आपण पुढील लिंक वर क्लिक करून वाचू शकता.

https://newsstorytoday.com/अनुकरणीय-भीमराव-पांचाळे/

भीमराव पांचाळे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version