१. मनाच्या पलीकडे
पाखरांची शाळा अजूनही
भरे कोमेजलेल्या फांदीवर
बाळे का हो वाटे खेडावन्या
ओझे आजीच्या खांद्यावर
किलबिल चिवचिवाट हा
ऐकण्या अधीर कान कुठे
अन कुठे हे सुख अनमोल
वेचण्या देवास नवस मोठे
म्हणे साय दुधावरली ही
प्रिय असे स्वासुरांआबा
क्षितीजाच्या पलीकडले
आले व्याप का नशीबा
वाटे या मनात कुतूहल
असले करू नियोजना
वृद्धा सम ठेऊ बाळका
अन रुजवावे सुबियाना
२. माझ्या स्वप्नास प्राण दे
रीत रित मन माझं
आपुलकीने भरून दे
रीत रीत जग माझं
आनंदाने सजवून दे
ये रे सख्या ये
तू माझ्या जीवना
ये रे सख्या ये
तू माझ्या जीवना
आसवे सुखाची
देऊन जा तू
आठवणी संगे
घेऊन जा तू
शब्द शब्द ओठांवर हे
गीत एक शोधून दे
रीत रित मन माझं
आपुलकीने भरून दे
रीत रीत जग माझं
आनंदाने सजवून दे
नात्यास आपुल्या
लावून झालर सुखाची
माझ्या स्वप्नास प्राण दे
माझ्या स्वप्नास प्राण दे
रीत रीत…..

— रचना : कोमल धनराज फलके. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 969484800