Home लेख काही राहून गेले …1

काही राहून गेले …1

0

“शिट्टी जमलीच नाही !”

लहानपणापासूनच एखादी गोष्ट करण्याची आपली खूप इच्छा असते. ती गोष्ट करण्यासाठी आपण प्रयत्नही करतो पण यश मिळत नाही. तर कधी प्रयत्न करीतही नसू, पण मनाला कायमची रुखरुख लागलेली असते, अरे ही गोष्ट आपल्या कडून राहूनच गेली !

तर या नव्या सदरात, पहिल्या भागात वाचू या, आपल्या पोर्टलचे नियमित लेखक श्री संजय फडतरे यांची “शिट्टी जमलीच नाही !” या बद्दल ची रुखरुख…
– संपादक

लहानपण ते ज्येष्ठ नागरिक या जीवन प्रवासात आवडणाऱ्या व बकेट लीस्ट मधल्या गोष्टी मी अमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही अंशी मी यात यशस्वीही झालो आहे.पण एक गोष्ट मी प्रयत्न करून देखील करू शकलेलो नाही. तोंडाचा चंबू करून जिभेच्या खोबणीचा वापर करत रेडिओ वरील गाण्यांना साथ देणारी शीळ घालू शकतो.पण फक्कड लावणीला उत्स्फूर्त दाद देणारी खणखणीत शिट्टी मात्र मी वाजवू शकलेलो नाही.

अशी ही शिट्टी तोंडांत बोट न घालता केवळ जीभ दुमडून वाजवली जाते. अंगठा व तर्जनीने जीभ दुमडत अथवा दोन्ही हाताची तर्जनी व मध्यमा ही बोटे तोंडांत घालून जीभ दुमडूनही विविध प्रकारे वाजवली जाते.अशी खणखणीत शिट्टी लीलया वाजवणारा मित्र रवींद्र ढमाळ व त्याच्या सारख्यांचा मला हेवा वाटत आला आहे. लहानपणी या कलेकडे मी औत्सुक्याने बघून वारंवार प्रयत्न करूनही शिट्टी वाजवायला मला जमलेली नाही.

उत्कृष्ट गाण्यांना किंवा हाक मारूनही ऐकु येणार नाही अशा प्रसंगात शिट्टीच उपयोगी पडते.आड रानात वाट चुकली किंवा दुसऱ्या तीरावरून नावाड्यास बोलविण्यास शिट्टीच कामी येते.शिट्टी मारणे ही कला तशी साऱ्यांना जमते असे नाही. याप्रमाणे मला ही कला राहून गेलेली आहे असेच वाटते.

संजय फडतरे

— लेखन : संजय फडतरे. पिंपळे गुरव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version