या जगात उगाचच
कुणाला मदत करू नका,
भल्याभल्यांना लोकांनी
दु:ख दिलंय
याच जगानं
श्रीकृष्णाला नाव ठेवलंय,
याच जगानं
शिवरायांना छळलंय
याच जगानं येशूला
क्रुसावर चढवलंय,
स्वातंत्र्य सैनिकांनाही
वेडं ठरवलंय
स्वतःतील गुण
ओळखा,
दोष काढायला
लोक आहेत की
पाऊल टाकायचं
तर पुढं टाका,
पाय खेचायला
लोक आहेत की
स्वप्नं पहायची तर
उच्च पहा,
खाली खेचायला
लोक आहेत की
प्रेम करायचं तर
स्वतःच्या ध्येयावर करा,
द्वेष करायला
लोक आहेत की
लोकांचं काम
तुम्हीच करणार असाल,
तर ते बिचारे
काय करणार ?
जगातले काही लोक
तुम्हाला मदत करतील,
तर काही
विरोध करतील
विरोध करणाऱ्यांना
करू द्यात,
तुम्ही चालत रहा
कुणी सोबत असो वा नसो

— रचना : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे, ह मु. इंग्लंड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ.☎️9869484800

आजच समाजाच वास्तव मांडणारी कविता
अभिनंदन प्रा.डाॅ.शिरसाठ साहेब
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र
८७८८३३४८८२