मुंबई येथील रंगूनवाला फाऊंडेशन कित्येक वर्षापासून शिक्षण, आरोग्य,प्रशिक्षणातून स्वयं रोजगार इ. सारखे कल्याणकारी उपक्रम मुंबई शहर, उपनगरात आयोजित करीत असते.
या फाउंडेशनने नुकतेच नरीमन पाॅईंट येथील कमल नयन बजाज सभागृहात किडनी रूग्ण व नातेवाईकांचे १३ वे स्नेहसंमेलन व कार्यशाळा आयोजित केली होती.

यावेळी रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षणातून रोजगार मिळावा याकरीता टाटा स्ट्राईव कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक यांनी शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, कोर्स कालावधी, कोर्स पश्चात रोजगार,मुदत कर्ज योजना इ.ची माहिती दृकश्राव्यादारे दिली.
रंगूनवाला फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येणारे विविध कोर्स व त्याला देण्यात येणारी सवलत, आर्थिक मदत इ.ची माहिती संस्थेच्या सीईओ नसरीन इब्राहीम यांनी दिली.रूग्णांना शासकीय योजनातून मिळणारी मदत व तेथील अडचणी जाणून घेऊन,शासन स्तरावर सोडवणूक करण्यासाठी रूग्ण मित्रांच्या साथीने संवांद साधून रूग्णांना दिलासा देण्यासाठीचे प्रयत्न करणार असल्याचे रूग्ण मित्र विनोद साडविलकर, धनंजय पवार,रमेश चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

रंगूनवाला फाऊंडेशन व एकता सपोर्ट ग्रुप यांच्या उत्तम नियोजनातून स्नेहसंम्मेलन व कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इ.जिल्ह्यातील साधारण ४५३ किडनी रूग्ण व नातेवाईकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800