हसूनी निघाली किती छानपैकी
नकोही म्हणाली किती छानपैकी
मला वाटले थेट जाणार आता
तरीही वळाली किती छानपैकी
तिच्या शब्द डोळ्यातले वाचले मी
नजरही मिळाली किती छानपैकी
तिने हासुनी जखम केली उरी जी
सुगंधी निघाली किती छानपैकी
उन्हाळ्यात सुटला, जणू थंड वारा
तिची याद आली किती छानपैकी
जरा दु:ख माझे तिने चाळले
अन् झाली गझल किती छानपैकी

– रचना : शेखर गिरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
गजल हा काव्य प्रकार एक भावनांची अभिव्यक्ती करण्याचे सगळ्यात प्रभावी माध्यम
अतिशय सुंदर गजल
अशाच सुंदर सुंदर गजलांच्या प्रतिक्षेत