Sunday, February 15, 2026
Homeसाहित्यकुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

थोर कवी कुसुमाग्रज यांच्या “कुणी, घर देता का रे घर ?” या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून.

एक उमेदवार भिंती वाचून,
छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून,
देवाच्या दयेपासून,
गल्लोगल्ली फिरत आहे,

जिथून कुणी उठवणार नाही
अशी जागा धुंडत आहे,
कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

खरच सांगतो बाबांनो
उमेदवार आता थकून गेलाय
इकडे तिकडे जमेल तसे
नोकरी, धंदे करून
अर्ध अधिक तुटून गेलाय

मिनतवार्‍या करून, हातापाया पडून,
घरच्यांची बोलणी खाऊन,
मित्रांची मस्करी सहन करून,
झुंज देऊन देऊन,
उमेदवार आता थकून गेलाय
उमेदवाराला आता
झटपट श्रीमंत व्हायचं आहे म्हणुन,
कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

खुरडत खुरडत चालत आहे
खरं सांगतो बाबांनो
उमेदवाराला न मिळणारी
उमेदवारीच नडतेय
हे बाबा, कुणी तिकीट देता का रे तिकीट ?

उमेदवाराला महाल हवा
राजवाड्याचा सेट हवा
पदवी हवी, हार हवा
थैली मधली भेट हवी

हवा एक मोठा व्हिला
पंख मिटून पडण्यासाठी,
हवी एक सोन्याची आरामखुर्ची
उमेदवाराला बसण्यासाठी,
एक मर्सिडीज हवी पुढच्या दारात
सरकारांना फिरण्यासाठी

कुणी तिकीट देता का रे तिकीट ?

देवेंद्र भुजबळ

— रचना : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. वास्तव्य विडंबनाद्वारे उत्तमरीत्या सादर केलेत.पूर्वीचे राजे पत्करले आणि एका प्रदेशाला एकच असे. आता गल्लोगल्ली! प्रत्येक ओळ त्यांची लोकांविषयी उदासीनता आणि उमेदवारी हवी केवळ आणि केवळ स्व कल्याणाखातीर…. हे उद्विग्न सत्य सांगणारी आणि
    ‘हवा एक मोठा व्हिला,
    पंख मिटून पडण्यासाठी ….फारच सुरेख

  2. कुणी तिकीट देता का रे…
    अत्यंत उत्कृष्ट विडंबन कविता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11