Sunday, February 15, 2026
Homeसाहित्यकुमारी माता

कुमारी माता

नको कुणाला तरी लाभते
दिव्यातून ती मोठ्या जाते
कलियुगातील कुंती सुद्धा
तीही एक माताच असते.

फुल नाजूक फुलता बागेत
माळ्याचेच पित्त खवळते
उपेक्षित शब्द वंचित प्रेमा
तीही एक माताच असते.

कोण चूक की सगळं बरोबर
त्यात पाप पुण्य कुणी मोजते
हे कठीण गणित सोडवणारी
तीही एक माताच असते.

अजाण बाला पाय घसरला
राहतो तो तरी नामानिराळा
देवून स्वनाव बाळा वाढविते
तीही एक माताच असते.

संतान अनौरस नामाभिधान
नाही पाळता विवाह बंधन
जरी शहाणी वेडीच असते
तीही एक माताच असते.

विलास कुलकर्णी

– रचना: विलास कुलकर्णी

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. श्री विलास कुलकर्णी यांनी आपल्या कवितेतून कुमारी मातेचे दुःख उत्तम रीतीने मांडले त्याबद्दल त्यांना धन्यवाद 🙏

  2. मातेचे दुःख एक पुरुष असून कुलकर्णी सरांनी आपल्या कवितेतून उत्तम मांडले आहे.
    प्रतिभा सराफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11