विरहात तुला पाहिलं
परंतु समजलाच नाही
बाललीला केल्यास तरी
विश्वरूप तुझे और काही …….
तुझ्या रूपाच्यावेळी
अजुनही मुर्च्छित देह
कसं समजून घ्यावे रूप
चलबिचलीत मन संदेह……
कृष्णा तुला ओळख आहे
तुझ्या कृत्यात कार्य मग्न
महाभारत तुझ्या युगात
आजही जग झालेलं भग्न
मुर्तीतून छान दिसतोय
येशील का रे प्रकट होऊन
अखंड जगही तुझ्या ध्यानात
कृष्ण नामात जाऊ पोहून……..
तुझ्या लिलांचा प्रभाव
मनुष्य देहावर पडावा
जन्म सार्थकी लागताना
एकतरी नरदेहात घडावा…...
बाकी समजण्यास कठिण
पण् कसं काय केलं सर्व सोपं
शास्त्र निती नियमात अडकलो
इथेही विणलेस तुझे गोपं………
वेदांनाही जमणार नाही
त्याला घेतलंस तुझ्या हाती
पार्थ साधाभोळा तुझ्यापुढे
तर लगेच झालास सारथी….….
कृष्णा अजून तू कळला पाहिजे
प्रत्येक हृदयात उतरून
तुला समजून घेता येऊन दे
मुर्तीत नाही प्रत्यक्ष विसरून…..…

– रचना : सौ माधवी ढवळे. राजापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800