कृष्ण निळी सांज
निळा नृत्योत्सव
शांत तो गवाक्ष
मोह गंध राधा
आतुर ती साक्ष
चांदणं टिपूर
शुभ्र जलोत्सव
टिपे राजहंस
किरण त्या खुणा
तळी जाई धून
प्रभा तीच घना
उमलते तुरे
प्रतिबिंब जली
शुभ्र ती मोहिनी
जाते भुलवून
धवल चांदणी

– रचना : ममता मुनगीलवार