रंगात तू
गंधात तू
हृदयाच्या प्रत्येक श्वासात तू
सागरात तू
श्रावणात तू
चमचमणाऱ्या प्रत्येक ताऱ्यात तू
क्षणात तू
अनंतात तू
शिंपल्याच्या प्रत्येक थेंबात तू
सत्यात तू
संघर्षात तू
जीवनाच्या प्रत्येक अनुभवात तू
उजेडात तू
अंधारात तू
भटकणाऱ्याच्या प्रत्येक वाटेत तू
मोहात तू
द्वेषात तू
भक्ताच्या प्रत्येक भक्तीत तू
मीरा बावरी मी
घनश्याम तू..
प्रेमवेडी राधा मी
कृष्ण सखा तू…

– रचना : पुनम सुलाने, हैदराबाद