पुणे येथील सौ. मोहना टिपणीस गेली दोन महिने त्यांच्या मुलीकडे ओटावा, कॅनडा येथे आहेत. त्या कविता, लेख, कथा इत्यादि मराठी साहित्य लेखन करीत असतात. मासिकांमधे व दिवाळी अंकात ते प्रसिध्द होत असते.
ओटावा येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव ४ दिवस साजरा करण्यात आला.
त्याबद्दल त्यांनी लिहिलेला वृत्तांत पुढे देत आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे सहर्ष स्वागत आहे.
– संपादक
देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा ७५ वा अमृत महोत्सव भारतातील प्रत्येक राज्य, प्रांत, गाव, शहर, खेडे येथे उत्साहात संपन्न झाला.
देशाप्रमाणेच तो विदेशामध्ये साजरा करण्यात आला .
ओटावा येथे सुद्धा The great India festival
महाभारतोत्सव दि. ११ ते १४ ऑगस्ट असा चार दिवस भव्य दिव्य कार्यक्रमांनी संपन्न झाला.
आजादी का अमृत महोत्सव
भारताच्या विविध प्रांतातील सांस्कृतिक परंपरा, भाषा, रूढी व ऐक्याचे दर्शन येथे झाले. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा सर्व राज्यातील नृत्य, संगीत यांची रेलचेल होती.
“महाराष्ट्राची लोकधारा” सादर करताना पंढरपूरच्या वारीचे अप्रतिम सादरीकरण झाले. तसेच शेतकरी नृत्य, कोळीनृत्य व लावणी जोशात झाली. या कार्यक्रमांनी उपस्थितांचे मने जिंकली.
या महोत्सवी कार्यक्रमात योगा, ब्लॉक प्रिंटिंग, हेना टॅटू, एम्ब्रोईडरी, भारतीय पारंपारिक मसाले तयार करणे इत्यादि प्रात्यक्षिके होती.
दशावताराचे मोठे पेंटिंग होते. त्यात उपस्थितांमधून लहान मोठे सर्व वयोगटातील लोक त्यात पेंट व ब्रशने दिलेल्या चित्राप्रमाणे चार दिवस रंग भरत होते. शेवटच्या दिवशी ते संपूर्ण तयार झाले.
भारतीयांनी मिरवणूक काढून झेंडावंदन केले.
भारतीय पद्धतीचे नाश्ता व जेवणाचे ताजे पदार्थ तयार तिथे उपलब्ध होते. भारतीय वस्तू कपडे, दागिने, विक्रीसाठी उपलब्ध होते.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी लता मंगेशकर यांना त्यांची गाणी सादर करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमासाठी निमंत्रितांमध्ये ओटावाचे मेयर जिम वॉटसन, मेंबर ऑफ पार्लमेंट चंद्रा आर्या, एक्टिंग हाय कमिशनर अंशुमन गौर, मेंबर ऑफ पार्लमेंट टोरांटो दीपक आनंद, एमपी अनिता Vandenbeld, एम पी यासीन नक्वी हे आवर्जून उपस्थित होते त्यांनी या सगळ्या कार्यक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या पर्यटन विभागाने, भारतीय दूतावासाने व काही प्रायोजकांनी आर्थिक मदत केली.
भारताबाहेर राहून सुद्धा आपल्या देशाचा जाज्वल्य अभिमान प्रत्येकात दिसत होता. वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा येत होत्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनात माझी मुलगी अनुपमा पोतदार हिचा सक्रीय सहभाग होता. कार्यक्रमातील काही भागांचे तिने निवेदन केले.
जावई अभिजीत व नातू अनिकेत यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य केले. येथील भारतीय अविरतपणे हे कार्य करत होते.
द ग्रेट इंडिया फेस्टिवल सातत्याने ११वर्षे येथे होत आहे.

चार दिवसांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम बघून अभिमानाने तिरंग्याला वंदन केले. एकंदरीतच हा महोत्सव आमच्या कायमच्या स्मरणात राहील अशा प्रकारे संपन्न झाला.

– लेखन : सौ. मोहना अजित टिपणीस. ओटावा, कॅनडा.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
Mohanatai tumcha sarwancha khup abhiman watato,very happy n proud of you all.
Good reporting!
Thanks.