Wednesday, July 2, 2025
Homeपर्यटनकेरळची खाद्यसंस्कृती

केरळची खाद्यसंस्कृती

नमस्कार, वाचक हो.
गणपती बाप्पाचे मोदक खाऊन तोंड गोड झाले ना ? म्हणून आज आपण केरळच्या खाद्य संस्कृतीमध्ये तिखट, मसालेदार, चटपटीत मांसाहारी पदार्थांची माहिती घेणार आहोत.

केरळचा समुद्र किनारा प्रसिद्ध असल्यामुळे सुरुवात माश्या पासूनच करू या. रोजच्या आहारात नारळाच्या तेलात केलेली माशाची करी ( मीन करी ) किंवा तळेलेल्या माश्यांचा वापर केला जातो.

करीमीन हा गोड्या पाण्यातला मासा जास्त प्रसिद्ध आहे. करिमीन, ऐकोरा, अवोली, मत्ती, चिनमीन आणि इतरही मासे सहज उपलब्ध होतात. प्रॉन्स, शिंपले, खेकडे असे विविध प्रकारचे जलचर प्राणीही खाल्ले जातात. Karimeen pollichathu, meen varathathu, kerla fish curry / fry तुम्ही इथे चाखू शकता. कैरी सोबत, शेवग्यासोबत माश्याची करी आवडीने बनवले जाते.

चिकन प्रेमींसाठी तर पर्वणीच..
Chicken roast, pepper chicken, chicken varathuthu, kerla chickn fry अशा अनेक विविध सुक्क्या चिकनचे पदार्थ मिळतात. तर चिकन करी मधेही अनेक पर्याय उपलब्ध होतात. Kerla nadan chicken curry, malabar chicken curry, pepper chicken curry आणि अजुन काही..
चिली चिकन , चिली परोठा , चिकन मन्चुरिअन असे चायनीज पदार्थामध्ये मोडणारे पदार्थही विशेष प्रसिद्ध आहेत.

मासे, चिकन भातासोबतही खाऊ शकता. पण इथला अजून एक खास प्रसिद्ध पदार्थ म्हणजे मलबारी पराठा. तुम्ही हा पराठा कशाबरोबरही आवडीने खाऊ शकता.

विविध प्रांतातील बिर्याणी तर खास आकर्षण. Thallassery biryani (मलबारी बिरयाणी),
Calicut biryani, kottayam style biryani खाद्यप्रेमीना मोहिनी घालतात.

मटण आवडणाऱ्या लोकांना मटणाचे पदार्थही वेगवेगळ्या चवीत, प्रकारात मिळतात.
आप्पम बरोबरही फिश करी, बीफ करी किंवा आवडीचे मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात. मुस्लिम आणि ख्रिश्चनांमुळे बीफचे विविध प्रकारचे पदार्थही इथे सहजपणे मिळतात.

याबरोबर पोर्क खाणाऱ्या पर्यटकनांही पोर्कचे पदार्थ मिळू शकतात, मिळतात. इथे येणाऱ्या मिरच्या ज्या आकाराने छोट्या असतात पण तिखटपणात मात्र जास्त तिखट असतात. (Birds chilli eye) यापासून बनवलेले मासे, चिकन, बीफ यांचे वेगवेगळे चमचमीत पदार्थही मिळतात.

मांसाहारी पदार्थांमध्ये कढीपत्त्याचाही भरपूर वापर होतो. आपल्याकडे सहसा मांसाहारी पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर करत नाहीत. ओलं खोबरं किंवा नारळाचे दुध, खोबरेल तेल, मिरे, कढीपत्ता साऱ्या चवी उठून येतात. खाद्य प्रेमींची भूक अजूनच वाढवतात.

कुठलेही पर्यटक केरळमध्ये फिरायला आले तरी माझ्या आवडीचा पदार्थ मिळाला नाही असे मात्र म्हणू शकणार नाही एवढं नक्की आहे.

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४