शिमगो आणि कोंकण म्हणजे स्वर्गात भरलेलो इंद्र दरबारच. शिमगो येवन ठेपलो आसा. तयारी इतक्या जोशात आणि धावपळीत जय्यतीत चालु आसा की कोणाचो कोणाक ताळमेळ नाय.
शिमगो म्हणजे कोंकणी माणसाचो जीव की प्राण. आमच्या तळकोकणात पालखी जास्त नसतत होळी मांडार आम्ही होळी दहन करतव. पण अगदी राजापूर पासून पुढे चिपळूण च्या पुढे पर्यंत पालखी नाचवली जाता आणि होळी साजरी केली जाता. एवढ्या जल्लोशात साजरी केली जाता की देवाची स्वारी आपल्या घराकडे येता आणि आपल्या आशीर्वादानं घराची भरभराट करता.

शिमगो म्हणजे होळी आणि रंगपंचमी चो सण. होळयेचा आख्यान सगळ्यांकाच म्हाईत आसा. वाईट गोष्टींचो जाळून केलेलो नायनाट आणि चांगल्या गोष्टीची प्रकाशमय उजाळणारी केलेली सुरवात. शिमगो म्हटलो काय संकासुर आणि गोमुचो नाच ह्यो असताच. गोमूच्या नाचाशिवाय शिमग्याक मज्जाच नाय.
शिमग्याचो दिवशी पोरं गावातल्या ठरलेल्या जाग्यार जमतत. मगे चालू होता मांडाच्या खांबासाठी लागणाऱ्या झाडाची तयारी. मानाचो खांब तोडल्यानंतर अगदी पुऱ्या गावातसुन तेचि मिरवणूक काढीत मांडापर्यंत आणलो जाता.

रात्री पुन्हा गावात सगळे पोरं अख्खी वाडी फिरतत आणि प्रत्येकाच्या घराच्या भायर होळी साठी ठेवलेला लाकूड सामान म्हणजे कोणी चुडता कोणी पीडे कोणी लाकडा असा सगळा जळवणीचा सामान पोर एकत्र करून मांडार आणून ठेवतत.
ह्या सगळा चालूच असता आणि ह्या कामात आनंदाने मोठ्या आवाजात अगदी यमक जुळयत शिवराळ भाषेत भल्या भल्या आणि चांगल्या चांगल्यानचे #मोजले जातत. विनोदी आणि आनंदी वातावरणात सणाचो आनंद घेतलो जाता.
आमची होळी सगळ्यात उशिरा पेटवली ह्या सगळा चालु असताना कोणी गायब झालो तर समजान जायचा कोणाच्या तरी परड्यातल्या अढसाळांच्या पेंडयेर धाड पडलेली असतली, कोणाचे आंबे, कोणाचे काजी नायतर कोणाचे नारळ गायब झालेले असतलेच.
आमची होळी सगळ्यात उशिरा पेटवली जाता म्हणजे ११/१२ वाजताच. गावकाराच्या गाऱ्हाण्यान होळी पेटवली जाता आणि मगे चालु होतत गावकऱ्यांची वार्षिक गाऱ्हाणी. नारळ फुला आणि गोडधोड प्रसाद म्हणून ठेवला जाता. रात्री उशिरापर्यन्त ह्यो सगळो कार्यक्रम चालु असता. जमा झालेलो सगळो प्रसाद लोकांका वाटून ह्या होळयेची सांगता केली जाता, पुढे सात दिवस रोज संध्याकाळी होळी पेटती ठेवली जात आणि रोज मांडावर पारंपारिक गाणं म्हणत फेरी मारली जाता.
दरवर्षी साजरो होणारो कोंकणातलो शिमगो आणि धुळवड कायमच लक्षात रवणारी असता. कोकणातलो प्रत्येक सण ह्यो आजुनव संस्कृती, परंपरा जपान साजरो केलो जाता.

अख्या आवाटात खांद्यार पालखी घेवन मिरवणं आणि गोमूचो नाच, संकासुराची वेगळीच कलाकारी ह्याची देही ह्याची डोळा बघण्याची उत्साही मजा ही भारीच असता.
घराकडे येऊन आपली दरवर्षीची ओळख आणि गोमूचा गाना सगळ्यांच्या आठवणीत असतालाच… ” आयना का बायना घेतल्या बिगर जाय ना ..!
गोमुचो नाच नी संकासुरान धरलेली पाट
गावाच्या मांडावर सजलो होळयेचो घाट
शबय शबय बॉम्ब मारीत येता संकासुर
पोरांका भिययत फिरता गावागावातसुन
आवडीनं बनता घराघरात पुरणाची पोळी
वाईटाची बांधून मोळी पेटवया होळी
होय म्हाराजा म्हणत गाऱ्हाणा गुरव घालता
पालखी येतली दारात घरवालीन अंगण सारवता
शिमग्याचो दिवस घेवन येता संस्कृती बांधिलकी
होळयेच्या दिवसान उजळांदे गावातली आपुलकी.
— लेखन : योगेश कांबळी. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Khup khup dhanyawad .. ya portal dware mala lihinyachi sandhi Dili .. aani aamachya konkanatlya hya sanachi mahiti sarvanparyant pohachavali tyabaddal khup khup aabhar.