संतांच्या चरणांनी,
जन्मभूमी पावन,
शिवाजींच्या कार्यानी,
स्वराज्याचा स्फुरण ॥
कणकवलीच्या चिपीत,
पांडुरंग अवतारले,
पुष्पक ईमानात,
तुकाराम बसले ॥
वंशाची वेल,
लाल मातीत रुजली,
पारंपारिक घराणी,
जन्मोजन्मी नांदली ॥
विकासाच्या ओघात,
विसरू नका निसर्गाक,
पैशाच्या मोहात,
विकू नका कोकणाक ॥
निसर्गाच्या स्वर्गाक,
स्वकीय धंद्यात जगवा,
परप्रांतीय पाहुण्यांक,
पाहुणचारान वागवा ॥
इमानाच्या उड्डाणानात,
एकजूट वाढवा,
पहाटेच्या किरणात,
मालकी हक्कान जगा ॥
माजो देश माजो गांव,
मना-मनात रुजवा,
कोकण माजो जीव,
अभिमानान मिरवा ॥

रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
“कोकणात ईमान ”
सौ. वर्षा महेंद्र भाबल यांच्या सकस लेखणीतून प्रसवलेल्या ” कोकणात ईमान ” ही अप्रतिम काव्य रचना कोकणाच्या लाल मातीतली वास्तव स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा विकास होत आहे. कदाचित त्यावरूनच कवयत्रीच्या मनात विविध विचार रूंजी घालतांना ह्या ओळी त्यांच्या मनात चितारल्याचे दिसते. मॅडमचे मनापासून अभिनंदन !!
राजाराम जाधव
खूप खूप धन्यवाद! सर. माझ्या कोकणच्या मनी असलेल्या भावना आपणा पर्यंत पोहचल्या, हीच माझ्या कवितेची कौतुक पावती आहे.
Thanks a lot!
सौ. वर्षा म.भाबल.
धन्यवाद वृंदा! तुझी इच्छा, तथास्तु!
आपणा सर्वांचे अभिप्राय, माझ्या लिखाणाला मिळणारी ऊर्जा आहे.
Thanks a lot!
कोकणात ईमान लय भारीच.वर्षा अशोच कवीता करीत रव्ह .