Home Uncategorized कोरोनाची गाथा

कोरोनाची गाथा

0

कोरोनाची काय सांगू गाथा
या जीवनाची झाली व्यथा

अगदी निघून चालली माणसं
कुणाचेच निरोप  न घेता
ना मांडीवर ना खांद्यावर
जीव जातो भर रस्त्यावर !……

ऑक्सिजनचा तुडवडा
भासत आहे या धरतीवर
औषधाचा काळा  बाजार
माणूस माणसाला करतो बेजार
याला नाही लाज शरम
हा करतो माणुसकीचा व्यापार
या कोपापुढे मग्रूर माणूस झाला केविलवाणा !! ना  मांडीवर ना खांद्यावर…..

नसे शवयात्रा ना अत्यंविधीचे पालन
स्मशानात जातो प्लास्टिकचे  बांधून आवरण
कुणाला वाटे माझ्या अस्थी जातील काशीला
परी कोरोनामूळे विसर्जन गावच्या घाटाला !! ना मांडीवर ना खांद्यावर…..

सगळया विधी कोरोनामुळे
जनमानसाने उरकले घाईघाईत
या कोरोनाच्या कोपामुळे  तीन धंदे चालतात जोरात
बाकी सारे कोमात !! ना मांडीवर ना खांद्यावर……

कोरानाच्या कोपात माणूस माणसाला शिवत नाही
यापेक्षा वाईट दिवस काय येईल कळत नाही
वाढली बेकारी  बुडाला रोजगार
देशोधडीला लागले गरीब मजूर कामगार !! ना मांडीवर ना खांद्यावर…..

देवदूतांच्या वेषात डॉक्टर, नर्स, पोलीस पत्रकार
अहोरात्र कर्तव्यनिष्ठने  राहती जन – रुग्णसेवेशी तत्पर
सामाजिक अंतर आणि मास्कचे बंधन पाळू या
कोरोनासोबत लढू या, कोरोनाला हरवू या !! ना मांडीवर ना खांद्यावर…..

हा विनोद आपल्याला करितो विनवणी
वृक्षवल्ली वाढवा, जपा निसर्ग, जगा नियमाने
वाढत्या भ्रष्टाचाराला  आळा घालुनी
रुग्णालय वाढवा, रुग्णालय वाढवा !! ना मांडीवर ना खांद्यावर……

विनोद भांडारकर.

– रचना : विनोद भांडारकर.
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version