Home साहित्य कोरोना बाय बाय…

कोरोना बाय बाय…

3

हो..हो……तो
कोरोना आला आणि
किती जणांच्या घरी
स्पर्श करून गेला.

काहीजणांनी..
आला जसा त्याला थोडा
मान दिला..
केले सगळे
जे जे होते गरजेचे

सर्व घरातल्यांनी
दिले ‘देणे‘ जणूकाही
होते ते लॅबचे..
दिले केले..सर्व..हा
निगेटिव्ह रिपोट
दिसला..
कोरोनाला पण
हायसे वाटले

पॉझिटिव्ह रिपोर्ट
पाहता तो ही
थोडा घाबरला..
म्हणतो कसा
मी पण पकलोय….

तुम्ही ‘मास्क ‘ लावाना
अंतरावर‘ राहून बोलाना
व्यवहार करा पण
काळजी‘ घ्या ना
घरीच रहा ना

इथे तिथे उगीच
कामा शिवाय
फिरू नका
बाय बाय करत
गेला..हं ‘तो’ कोरोना.

मी म्हंटल
त्याला जाता जाता
उतू नको मातू नको
कुणाच्या ही घरी
असा आगंतूक
जाऊ नको..
कळवून पण
जाऊ..नको

गेला तर हातपाय
पसरून बसू नको
ठाण मांडून  तर
बसायचेच नाही हं!

लहान मुलं
तरूण मुलांना
मनसोक्त जगू दे
मोठ्या माणसांना
कामं करू दे
वरिष्ठ लोकाना
जरा मनासारखं
जगु दे.

तू तू तूझ्या घरी
गपगुमान रहा
ना मजेत
आम्हाला म्हणतो ना
घरीच रहा मग
आम्ही तुझं ऐकतो
आम्ही आमच्या
घरी राहतो ना
गपगुमान.

गेला ग बाई
गेला कधीही न
येण्या साठी..
मोठ्ठा बाय करत गेला

#पूर्णिमानंद #

रचना – पूर्णिमा शेंडे.

3 COMMENTS

  1. कोरोनाबद्दलची हकिकत यामध्ये व्यवस्थित ,सविस्तर लिहिलीयं…बरं वाटलं वाचुन…खंरच….
    बाय बाय ……….कोरोना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version