Friday, November 22, 2024
Homeलेखकोरोना, आता तू जा बाबा!

कोरोना, आता तू जा बाबा!

आज एक बातमी वाचली. एका लोकप्रिय व्यक्तीचं कोरोनानं निधन झालं होतं. खूप वाईट वाटलं वाचून. आजकाल सगळीकडे कोरोनाच्या अशाच बातम्या ऐकायला, वाचायला मिळतात. मन खूप विषण्ण होतं. हे काय चाललंय जगभर? यावर उपाय म्हणून सध्या संचारबंदी लावण्यात आलीय. हे सर्वांच्या हिताचे असलं तरी घरी बसून काय करावं? हे सुचत नाही. अशावेळी खरं तर मैत्रिणींची आठवण येते. एकत्र गप्पा मारणे, जोक्स, मस्ती हेच सर्व आठवते. ऑफिसमध्ये कामात किती चांगला वेळ जायचा. पण आता रिटायर्ड मुळे खूपच एकटं वाटायला लागत.

भूतकाळात रमलेली असतानाच एका मैत्रिणीचा व्हिडीओ आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आला. सर्व मैत्रिणींचे एकत्र मस्ती करतानाचे फोटो, एक एकटीचे सहज न विचारता काढलेले पण सुंदर ऍक्शन असलेले, पिकनिकचे या सगळ्या फोटोचा तिने हा व्हिडीओ केला होता. तो व्हिडिओ बघून मनाला खूपच उभारी आली. मग त्या व्हिडीओ वरुन एकेकीचे मत, परत जोक्स आणि शेवटी व्हिडीओ कॉल करून परत गप्पा. यात कसा वेळ गेला हे काही कळलेच नाहीं.

खरं तर सध्याच्या काळात असेच एकमेकांना फोन करून विचारपूस करायला हवी. प्रत्येकाला बरे वाटते. नुसता कॉल करून कशी आहेस ? असं विचारलं तरी. आमची एक मैत्रिणी कोरोना झाल्यामुळे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती. आम्ही सर्वं मैत्रिणी एकमेकींकडे तिची चौकशी करत होतो. तर ग्रुप मधील एक मेंबर तिच्याशी सतत संवाद साधत होती. तिचे मनोबल वाढवत होती. आम्ही सर्वं तिची विचारपूस करतोय हे तिच्या पर्यंत पोहोचवत होती. यामुळे ती लवकर बरी झाली. औषधाबरोबरच असा संवाद माणसाला लवकर बरे करतो. कारण त्याचे मनोधर्य वाढलेले असते. संवादामुळे मोठ्यातला मोठ्या आजारावरही मात करता येते. दुसरं उदहारण म्हणजे, आमच्या ग्रुप मधील मैत्रिणीच्या मुलीला करोना झाला. ती घरीच विलगीकरणात राहिली. कारण कोरोनाच्या हाहा:कारामुळे हॉस्पिटल मध्ये बेड मिळायची मारामार. आम्ही रोज ‘कशी आहे तुझी लेक ?’ अशी फोन करून चौकशी करायचो. त्यामुळं तिला मुलीच्या आजारपणामुळे आलेले टेन्शन कमी झाले. कारण आई म्हणुन ती मुलीची काळजी घेतच होती. पण या वयात म्हणजे, रिटायर्ड नंतर काम करायचा उत्साह तेवढा रहात नाहीं. उगाचच टेन्शन घ्यायची सवय झालेली असते व अशा वेळेस सर्व माहित असूनही काही गोष्टीत विसरायला होतं. त्यामुळे संवाद असेल तर मन मोकळे करून दोन धीराच्या गोष्टीमुळे अंगात उत्साह संचारतो. संवाद हे असं शस्त्र आहे की करोनाच्या या काळात याची नितांत गरज आहे.

खरंतर अलेक्झांडर ग्राहम बेल, ज्यांनी टेलीफोनचा शोध लावला व त्यामुळे “दुनिया मेरे उंगली पे” आली म्हणावेसे वाटते. तर भारतात सॅम पिट्रोदा यांनी टेलिफोनमध्ये केलेली क्रांती, यामुळे सर्व जगाला एकमेकांजवळ आणले. या दोघांचे शतशः आभार ! मोबाईल आणि त्या बरोबरच सोशल मीडिया तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. आजकाल मोबाईल मध्ये वापरली जाणारी ईमोजी सुद्धा एक संवादचे उत्तम साधन आहे. कारण वेगवेगळी ईमोजी वेगळा संदेश पोचवते. उदा. कपबशी, म्हणजे चहा, हसण्याच्या ईमोजी, चेहऱ्याच्या ईमोजी अशा कितीतरी प्रकारामुळे संवाद साधला जातोच पण त्याबरोबर काही वेळेस हसू आवरत नाहीं. मन प्रसन्न होते. फोटोसुद्धा एक संवादाचे उत्तम साधन आहे. कारण त्यामुळे जुन्या आठवणीला उजाळा मिळतो.

कोरोनापूर्वी आपण धावपळीच्या जीवनात सहवासाला मुकलो होतो. जो तो आपापल्या कामात इतका व्यस्त होता की, त्यासाठी कोरोनारूपी राक्षसाला जन्म घ्यावा लागला आपल्याला धडा शिकवायला. पण आता या कोरोनारूपी राक्षसाला म्हणावं, बाबा आम्ही तुझ्या कडून खुप धडा घेतला. माणुसकीचा, सहवासाचा, संवादाचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःचे आरोग्य कसे जपावे याचा. कोरोना, आता तु जा बाबा. आम्ही उतनार नाहीं मातनार नाहीं घेतला वसा टाकणार नाहीं.

लेखन – अलका भुजबळ. 9869043300

RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. अलका असेच छान छान लेख वाचायला मिळू दे.
    खूप शुभेच्छा .

  2. Found your articles Very informative, interesting and positive thoughts towards life. Keep writing up always and give us immense pleasure and
    opportunities to read more and more.

  3. अतिशय सुंदर आणि सद्धपरिस्थीतीवर मार्मिक लेख आहे. प्रत्येक मैत्रीणीच्या मनाचे प्रतिबिंब यात उमटले आहे . अलका तुझे खुप खुप कौतुक आणि पुढेही असेच छान लेख आम्हाला वाचायला मिळू दे ही सदिच्छा 👍💕

  4. मॅडम, खूप छान लेख👌👌👌
    आजूबाजूच्या परिस्थितीमुळे मन उदासीनतेकडे झुकत आहे, अश्या वेळी आपले लेख/ विचार वाचून मनाला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे, thanks a lot 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments