कोरोना कोरोना आलास काय
आमच्यासाठी शाळा बंद करून गेलास काय !
आधी वाटले धम्माल मजा
आधी वाटले धम्माल मजा
नंतर झाली तीच सजा
मित्र नाही मैत्रीण नाही
एकटे आम्हाला पाडलेस काय
आमच्या साठी शाळा बंद करून गेलास काय!
कुठे बाहेर जाणे नाही
कुठे बाहेर फिरणे नाही
माणसाला घरात जेलमध्ये कोंडलेस काय
आमच्या साठी शाळा बंद करून गेलास काय!
असे वाटले परीक्षा नाही
असे वाटले परीक्षा नाही
पण ऑनलाईन परीक्षा घेऊन
आमची विकेट काढलीस काय
आमच्या साठी शाळा बंद करून गेलास काय
घरात आई ओरडते नको खेळू मोबाईल
घरात आई ओरडते नको बघू टीव्ही
करायचे तर करायचे काय ?
कोणी बोलायला नाही
कोणी खेळायला नाही
कोरोना आता बस्स झाले जाशील काय ?
आमचे बालपण परत देशील काय?
आमची शाळा परत खोलशील काय?
खूप आहेत प्लॅन
खूप आहेत प्लॅन
मित्रांसोबत बागडून खूप मस्ती करून
द्यायचा आहे सर्वाना त्रास
कोरोना कोरोना आता जाशील काय ?
आमची शाळा परत खोलशील काय ?

– रचना : डॉ अस्मिता जाधव