सध्या कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे लोकांवर मानसिक ताण पडलाय. मनुष्याची दिनचर्या बिघडली आहे, म्हणून जनतेचे मन रमवणे व समाजातील ताणतणाव कमी करण्यासाठी त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, त्यांची करमणुक व्हावी या हेतुने अहमदनगर येथील हरहुन्नरी कलाकार व कला विश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत दंडवते यांच्या संकल्पनेतून ‘संगीत कला फिरता मंच’ हा सांस्कृतिक उपक्रमास इव्हॅंजलाइन बुथ हाॅस्पिटल येथुन नुकतीच सुरवात करण्यात आली.
अहमदनगर येथील इव्हॅंजलाइन बुथ हाॅस्पिटल गेल्या १२१ वर्षापासून देवदूतासारखेच मनुष्य रुग्णसेवा नि:स्वार्थीपणे करीत आहे व आत्ताच्या महामारीत तीच सेवा, परंपरा सांभाळत अविरत रुग्णसेवा देत आहे.
बुथ हाॅस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांनी आपल्या आवाजात प्रार्थना म्हणून औपचारिक उदघाटन करण्यात आले.
संगीत कला थेरपीद्वारे मानसिक आजार बरा होतो हे फार पूर्वीपासून मानसोपचारामध्ये सिद्ध झाले आहे. या ताणतणावाच्या परिस्थितीत दंडवते या संगीत कला उपक्रमाव्दारे ही सेवा देतात हे कौतुकास्पद आहे असे यावेळी श्री कळकुंबे म्हणाले.

प्रशासनाने दिलेले सर्व नियम व अटी पाळुन हा उपक्रम दंडवते हे कलाकार या नात्याने रुग्णांसाठी उतराई होण्यासाठी रूग्णांना संगीत कलेव्दारे सेवा देत आहे.
कराओके सिस्टीमवर हिंदी जुन्या चित्रपटातील गायकांची उडत्या चालीची गाणी, जसे किशोरकुमार, मोहम्मद रफी, मुकेश, हेमंत कुमार, मन्ना डे, येशुदास इ. दंडवते यांनी आपल्या आवाजात सादर केली. दोन तासांच्या कार्यक्रमात पंधरा एक गाणी त्यांनी गायली ‘आसमानसे आया फरिश्ता, चॅंदन सा बदन, नखरेवाली, बेकरार करके हमे, ओ मंचली, रिम झिम गिरे सावन इ.
रुग्णांनी प्रसन्न वातावरणात संगीत ऐकण्याचा आनंद घेतला, त्यांनी मंत्रमुग्ध होऊन प्रत्येक गाण्याला मनसोक्त दाद दिली. यावेळी बुथ हाॅस्पिटलचे डाॅक्टर, परिचारिका व कर्मचारी योध्दा उपस्थित होते. कोरोना दक्षता पथक प्रमुख शशीकांत नजन यांनी आभार मानले. या उपक्रमामुळे रुग्णांचे ताणतणाव निश्चितच कमी होईल असे सांगून त्यांनी इतरांनी घरी रहा व सुरक्षित रहा, लस घ्या, आपण या महामारीच्या लढ्यात निश्चित विजय होऊ असा विश्वास व्यक्त केला.
या उपक्रमास सर्वश्री ललित सुराणा, अजित गुंदेचा, उमाशंकर औचट, यांचे सहकार्य लाभले. राॅयल बॅण्ड साऊंड सिस्टम, नाटक क्षेत्रातील कलाकार सुफी सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.
नगरमध्ये सुरू करण्यात आलेला फिरत्या मनोरंजनाचा हा अभिनव उपक्रम खूपच स्तुत्य असून इतर ठिकाणीसुद्धा त्याचे अनुकरण होण्याची गरज आहे.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.

नमस्कार सर
आपण दखल घेऊन या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती सर्वांन पर्यंत पोहचवली त्या बद्दल आपले धंन्यवाद🙏
स्तुत्य उपक्रम.. हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा