Monday, December 23, 2024
Homeबातम्याकोरोना : लग्नाचा अनोखा वाढदिवस

कोरोना : लग्नाचा अनोखा वाढदिवस

कोरोनामुळे गेल्या वर्ष दीड वर्षांपासून सर्व सणवार, मेळावे, समारंभ, सोहळे थांबले आहेत.अशाही परिस्थितीत काही व्यक्ती अनोखी, विधायक शक्कल लढवून आपला आनंद साजरा करीत आहेत.

पुणे येथील श्री मदन लाठी, हे असेच एक उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या लग्नाला नुकतीच ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या संचारबंदी आणि सुरक्षितता यामुळे सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांना ते बोलावू शकले नाहीत. यावर उपाय म्हणून ते व त्यांची पत्नी ज्या जिजामाता रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी दाखल झाले होते, तिथे गेले व त्यांनी तेथील सर्व डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांना श्रीफळ, पुष्प, मिष्टान्न देऊन त्यांचे आभार मानले. या अनपेक्षित भेटीने सर्वच जण आश्चर्यचकित तर झालेच पण आनंदीतही झाले.

श्री. व सौ. मदन लाठी डॉ. चा सत्कार करताना.

ओळखीच्या असो वा नसो, ज्या व्यक्तींचे वाढदिवस, प्रमोशन्स असतात, त्यांना श्री लाठी शक्य असल्यास समक्ष अथवा फोन, ईमेल, व्हाट्सएप, फेसबुकच्या माध्यमातून आवर्जून शुभेच्छा देत असतात. समाजात आनंदी वातावरण असावे, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आताचा हा त्यांचा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.

– देवेंद्र भुजबळ.9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. खूप छान योजना आहे.
    श्री लाठी साहेब यांचे अभिनंदन!

  2. Indeed an appreciable way of celebration. In this pandemic period alongwith the front runners. Celebration like this gives more happiness to self and others.
    Great job.

  3. The proper way is chosen to respect their services!!! Thanks to everyone who served humanity. 💐💐💐
    Congratulations to you for that 👍🌹

    From
    Dr Ramesh Lathi
    Jalgaon

  4. खूप छान योजना आहे.
    अनुकरणीय बाब आहे.
    श्री लाठी यांचे अभिनंदन!

  5. श्री मदन लाठी यांचं नाव सामाजिक क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जातं. ते नेहमीच त्यांच्या सामाजिक उपक्रमातुन सामाजिक बांधिलकी जपत असतात. Covid सारख्या जीवघेण्या आजारामधून बाहेर आल्यावर त्यांनी अनेक वेळा प्लाजमा डोनेट केला. जनजागृती केली. तसेच कोरोना योध्याचा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढविला. त्यांच्या अभिनव कृतींला सलाम.

  6. [5/12, 19:32] Kapoor Lathi: Novel/ Unique and most Suited to current Situation
    This is wonderful way of
    Expressing the Gratitude for the selfless services being rendered by the Doctors/ Sisters/ hospital staff
    This is V Amazing way of
    Celebration of MA
    Congratulations.
    Kapur and Vijaya Lathi
    Kothrud
    Pune

  7. अभिनंदनीय💐💐💐
    खूप खूप शुभेच्छा💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७