Home Uncategorized कोरोना : शिर्डीत पोलिसांना वाफ मशीन(Steamer)

कोरोना : शिर्डीत पोलिसांना वाफ मशीन(Steamer)

0

कोरोनाच्या महामारीने देशात थैमान घातल्याने लोक बेजार झाले आहेत. अनेकांनी या आजारामुळे प्राण सुद्धा गमावलेत. त्यात काही पोलिस बांधवांचा देखील समावेश आहे. या काळात पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी व पत्रकार हे आपले जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहेत.

या सर्वांचे तसेच समाजाचे आपणही काही देणे लागतो म्हणून  साईबाबांमुळे पुनीत झालेल्या शिर्डी येथील दानशूर व्यक्तिमत्व असणारे माजी नगरसेवक राजे प्रतिष्ठानचे संस्थापक तथा दैनिक साईदर्शनचे कार्यकारी संपादक तुषार गोंदकर  यांनी दिवसभर उन्हातान्हात उभे राहून आपली सेवा बजावत असणाऱ्या पोलिसांना वाफेचे मशीन(Steamer) भेट दिले. यामुळे या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळेल असे कार्य केले आहे.

याबाबत बोलताना तुषार गोंदकर म्हणाले की सामाजिक जीवनात आपण अनेक कार्य करत असतो. परंतु समाजाला आज ज्या गोष्टींची गरज आहे त्या उपयोगी वस्तू दानशूर लोकांनी पुढे येऊन समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हीसुद्धा असाच छोटासा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून दिलासा मिळतो.

राजे प्रतिष्ठानचे, तुषार गोंदकर, नितीन गोंदकर, समीर वीर, पप्पू पंडित, संजय गव्हाणे, नगरसेवक पप्पू गायके आदी कार्यकर्ते, कोरोनाच्या काळात सतत काम करीत आहेत.

तुषार गोंदकर.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version