जे पी त्रिवेदी ट्रस्ट आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे येथील घोले रस्त्यावरील प्रोफेसर जे.पी. त्रिवेदी मेमोरियल ट्रस्ट एम.ए.बॉइज् होस्टेल येथे ‘श्वास’ कोविड आणि विलगीकरण केंद्राचे उद्घाटन रोटरी क्लब पुणे जिल्ह्याच्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
७० बेडची क्षमता असलेल्या या उपचार केंद्रामधे सध्या २० ऑक्सिजन बेड व विलगीकरण कक्षात १० बेड उपलब्ध असून शासनाने निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा कमी दरात या केंद्रामधे उपचार मिळू शकतील असे रश्मी कुलकर्णी यांनी सांगितले.
पुण्यातील २४ रोटरी क्लब्सनी मिळून जिल्हास्तरीय रोटरी क्लबच्या आर्थिक सहाय्याने या केंद्राची उभारणी केली असून हे केंद्र सर्वांसाठी खुले असणार आहे.
पालिकेकडून संमती मिळून पण ऑक्सिजन सिलेंडरच्या कमतरतेमुळे श्वास केंद्राच्या उद्घाटनास विलंब झाला असला तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेली आहे तेव्हा हे केंद्र उपचारांसाठी सज्ज आहे असे कुलकर्णी यांनी नमूद केले. उद्घाटन प्रसंगी सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष तसेच कोविड उपचार केंद्राच्या प्रकल्पाचे आवाहक सुदिन आपटे आणि सह-आवाहक पराग मुळे उपस्थित होते.

– लेखन : करुणा पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
