स्त्री उन्नतीच्या क्षेत्रात गेली ४९ वर्षे हुंडाविरोधी चळवळ, मुंबई ही संस्था अव्याहतपणे कार्य करीत आहे. संस्थेच्या संस्थापक सदस्या कै. सौ. राधाबाई कुलकर्णी, ज्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भूमिगत असलेल्या साने गुरुजींना सहाय्य करण्याचे भाग्य लाभले, त्यांच्या स्मरणार्थ गेली १३ वर्षे संस्थेतर्फे जिल्हास्तरावरील एका समाजसेवी महिलेस
“विधायक कार्यकर्ती पुरस्कार” दिला जातो.
आजवर पुढील १२ जिल्ह्यातील विधायक कार्य करणाऱ्या १२ महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.
(१) प्रा.शीला पाटील – जळगाव (२००८)
(२) डॉ.सुधा कांकरिया – अहमदनगर (२००९)
(३) एडव्होकेट संगीता भाकरे -अकोला(२०१०)
(४) श्रीमती नलिनी फुसे – अमरावती (२०११)
(५) डॉ.रश्मी बोरीकर – औरंगाबाद (२०१२)
(६) प्रा.सविता शेट्ये – बीड (२०१३)
(७)डॉ.तेजस्विनी भुस्कुटे – गोंदिया (२०१४)
(८) डॉ.इंदुमती लहाने – बुलडाणा (२०१५)
(९) डॉ.पारोमिता गोस्वामी-चंद्रपूर(२०१६)
(१०) श्रीमती मीना भोसले – धुळे (२०१७)
(११) श्रीमती शुभदा देशमुख – गडचिरोली (२०१८)
(१२) ऍडव्होकेट कल्पना त्रिभुवन,जालना(२०१९)
यंदा हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यात १० वर्षे सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या समाजसेवी महिलेस दिला जाणार आहे.
पुरस्कारासाठी विहित नमुन्यात दिनांक १० मे २०२२ पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांसाठी कार्य करणाऱ्या महिलांचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
पुरस्कार मुंबई येथे एका विशेष समारभात दिला जाईल. पुरस्काराचे स्वरूप : १० हजार रुपये, सन्मानपत्र, साडी-श्रीफळ व ग्रंथ भेट असे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
आशा कुलकर्णी, महासचिव – हुंडाविरोधी चळवळ, ४/५० विष्णूप्रसाद ‘बी’ सोसायटी, शहाजी राजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व) मुंबई ४०००५७.
संपर्क दूरध्वनी : ०२२-२६८३६८३४ भ्रमणध्वनी : ९८१९३७३५२२/९८१९५३९१९३.
Email : antidowry498a@gmail.com Website : www.antidowrymovement.com
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.