Thursday, June 19, 2025
Homeकलाकोळपकर दाम्पत्याचं जहांगीरमध्ये चित्र प्रदर्शन

कोळपकर दाम्पत्याचं जहांगीरमध्ये चित्र प्रदर्शन

मुंबई येथील जगप्रसिध्द जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार, प्रा अरविंद कोळपकर व त्यांच्या पत्नी, चित्रकार हर्षदा
कोळपकर यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन 14 मार्च रोजी, अतिशय अभिनव पद्धतीने म्हणजे, कुठल्याही प्रथितयश व्यक्तीच्या हस्ते न करता, दोन्ही चित्रकारांच्या आई, अनुक्रमे अरुणा वसंतराव कोळपकर आणि शीतल शशिकांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन 20 मार्च 2023 पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे.

या प्रदर्शनात अरविंद कोळपकर यांनी ‘स्त्री आणि पुरुष’ यांच्या भावनिक नातेसंबंधांच्या आकृती प्रधान चित्रमालिका तर हर्षदा कोळपकर यांनी कोकणस्मृती संकल्पनेवर सृजनात्मक निसर्ग चित्र मालिका सादर केली आहे. अतिशय सुंदर रेखाटलेली ही चित्रे रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अल्प परिचय
प्रा अरविंद कोळपकर:
प्रा अरविंद वसंतराव कोळपकर यांचे शिक्षण ATD, G. D. art, Dip e ed, Master of fine art इतके झाले आहे. ते गेली 23 वर्षे प्राध्यापक म्हणून अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.

प्रा कोळपकर यांची भारतात मुंबई, कलकत्ता, हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली, गोवा येथे तर परदेशात अमेरिका, दुबई, सिंगापूर,अशा ठिकाणी मिळून जवळपास 50 /60 एकल आणि ग्रुप प्रदर्शने झाली आहेत.

प्रा कोळपकर यांना भारतातील अनेक नामवंत स्पर्धेत 10 पारितोषिके मिळाली आहेत.

हर्षदा कोळपकर:
सौ. हर्षदा अरविंद कोळपकर यांचे शिक्षण G. D. art, Dip e ed ईतके झाले असून त्या व्यावसायिक चित्रकार आहेत. त्यांची भारतात पुणे, मुंबई, कलकत्ता मिळून एकूण 15 /20 एकल आणि ग्रुप प्रदर्शने झाली आहेत.

कला शिबीर सहभाग :
1) ललित कला अकॅडमी, दिल्ली आयोजित इंदोर येथे सहभाग
2) इत्यादी फाउंडेशन, जबलपूर येथील कला शिबिरात सहभाग
3) वूमन इंटरनॅशनल वूमन आर्टिस्ट शिबीर जयपूर येथे सहभाग
4) महाराष्ट्र राज्य आयोजित रत्नागिरी येथे कलाकार म्हणून सहभाग
5) वेस्ट सेंट्रल झोन उदयपूर आयोजित गोवा येथील शिबिरात सहभाग.

हर्षदा यांना आतापर्यंत पारितोषिक अनेक नामवंत स्पर्धेत 8 पारितोषिके मिळाली आहेत.

आपण चुकवू नयेत, अशीच या दोघांची चित्र प्रदर्शने आहेत. दोघांच्याही पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments