टी ट्वेण्टी मधील भारताच्या विजयावर आधारित श्री प्रकाश फासाटे यांचा लेख आपण काल वाचला. आशा आहे की, आपल्याला तो आवडला असेल. आता क्रिकेट मध्येही महिला मागे नाहीत, हे दाखवून दिले आहे, कवयित्री स्वाती दामले यांनी. वाचू या त्यांची क्रिकेट कविता…
– संपादक
रसिक करिती मुजरा झुंजार चमूला
कडवी झुंज देऊनि जो विजयी जाहला
ठेवूनी मनी ईर्षा ती सतत जयाची
विजिगिषु लढवय्यांसि साथ जनांची
देशप्रेम उसळू द्या, स्वार्थ ना धरी
दावी जरा जगताला जोर मनगटी
उत्कृष्ट खेळ करुनि राखी संघभावना
कडवी झुंज—– //1//
एकात्म प्रतीक असे चमू भारतभूचा
विविध प्रांत, जाति, धर्म शोभत साचा
एकदिले मंत्र एक राष्ट्रभावना
रसिक करिती विजयाची सतत कामना
आकांक्षा विजयाची सार्थ यशाला
कडवी झुंज—– //2//
हृदयाच्या पायघड्या रसिक घालिती
हर्षाने स्तुतिसुमने, धनही उधळिती
प्रेमाच्या कौतुकास ये मग भरती
खळखळ हास्याच्या त्या नद्या वाहती
लाभो विजयश्री सदा हीच प्रार्थना
कडवी झुंज——- //3//
— रचना : स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Chan