आज ९ ऑगस्ट, क्रांती दिंन आहे. या निमित्ताने क्रांती दिनावर केलेली कविता वाचू या. भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो.
– संपादक
स्वातंत्र्य लढ्यातील
सोनेरी पान
ऑगस्ट क्रांतीदिन
महत्व महान
प्रस्ताव मांडला
चले जाव चळवळीचा
करेंगे या मरेंगेच्या
घोषणेचा
आंदोलने, सत्याग्रह
लोण पसरले
स्वातंत्र्य संग्रामाचे
वारे वाहू लागले
क्रांतीच्या बलिदानाला
यश आले
भारताला स्वातंत्र्य
मिळाले
श्रद्धांजली त्या शौर्याला
क्रांतीवीरांच्या धैर्याला
— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800