कितीही अपयश आले तरी खचून जाऊ नका. अपयश हे क्षणिक असते. त्यामुळे पुढे जाण्यासाठी जिद्द निर्माण करा, असा मोलाचा सल्ला महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी दिला. ते
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाच्या कालिका देवी मंदिराच्या प्रतिष्ठाणचा वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, पालकांनीही मुला- मुलींच्या टक्केवारीमागे न लागता त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे जेणेकरून ते त्यांचा उत्कर्ष साधतील.
कासार समाजाचा भांडी आणि बांगड्या हा परंपरागत व्यवसाय असला तरी या समाजातील अनेकजण आपल्या स्वकर्तृत्वावर पुढे गेले. कुणी शासकीय मोठ्या हुद्यावर तर कुणी उद्योजक, डॉक्टर, इंजिनिअर बनले. तर काहींनी स्वतंत्रपणे व्यवसाय उभे करून आपला व समाजाचा उत्कर्ष साधला. समाजातील जे लोक पुढे गेले, त्यांच्याविषयीची माहिती समाजातील लोकांपर्यंत पोहोचावी व त्यातून अनेकांनी प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने श्री. देवेंद्र भुजबळ यांनी संकलीत केलेल्या आणि लिहिलेल्या ‘समाजभूषण‘ या पुस्तकाचे यावेळी क प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील लेख व त्याचे संपादन श्री. भुजबळ यांनी केले असून, रश्मी हेडे यांनीही विविध क्षेत्रातील व्यक्तींबद्दल या पुस्तकात लेखन केले आहे. या दोघांचाही शाल, श्रीफळ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
तत्पूर्वी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश मांगले यांनी श्री. देवेंद्र भुजबळ यांचा परिचय करून दिला. तर लेखिका रश्मी हेडे यांचा परिचय अलका भुजबळ यांनी करून दिला.
रश्मी हेडे यांनी या प्रसंगी बोलताना येथे जो माहोल दिसला त्याबद्दल आनंद व्यक्त केला. याठिकाणी एवढे सुंदर मंदिर उभारले याचा खूप आनंद झाला आहे पण हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ न राहता ते सांस्कृतिक व प्रगतीशील केंद्र बनले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना न्यूजस्टोरीटुडेच्या सह संपादक अलका भुजबळ यांनी पोर्टलची सविस्तर माहिती देऊन “वाचाल तर वाचाल” हा जसा मंत्र आहे,तसा
“लिहाल तर लिहाल” हा नवा मंत्र सांगून सर्वांना लिहिते होण्याचे आवाहन केले.
यावेळी समाजसेविका आशाताई कुंदप यांनीही समाजाची नेत्रदीपक प्रगती होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सुरवातीला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश मांगले यांनी प्रास्ताविक केले. तर सचिव सुनील लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शोभाताई तिवाटणे, खजिनदार लक्ष्मीकांत कोळपकर, ज्येष्ठ पत्रकार शेषराव वानखेडे, इतर मान्यवर यांची व समाज बंधू भगिनींची मोठी उपस्थिती होती.
अतिशय सुंदर वातावरणात हा कार्यक्रम आयोजित झाला.
– टीम एनएसटी 9869484800
In this critical situation your advice to all youngster is very important that can give instinct to them as well as do write and then write is very valuable mantra given bo Alkatai. So both are doing well job in your retirement life. God may give you strength, corough and good health. Hv a Good Friday. BSG.
“क्षणिक अपयशाने खचू नका” हा अतिशय योग्य असा सल्ला देवेंद्रजींनी दिला आहे. या वेबपोर्टलमुळे माझ्या सारख्यांना उत्तेजन देण्याचे बहुमोल कार्य अलकाताईंसह ते करत आहेत. त्यांचा “लिहीते होण्याचा” सल्ला पण खुप मोलाचा वाटला.
क्षणिक अपयशाने खचू नका!
मोलाचा संदेश!
अभिनंदन! श्री. व सौ.भुजबळ.तुमचे दोघांचे कौतुक करावे, तेवढे कमीच! तुमच्या कडून मिळणारे मोलाचे मंत्र,जनजागृतीसाठी अमृत ठरावे!
सौ.वर्षा म.भाबल.